IAS अधिकारी स्वाती म्हसे पाटील यांची बदली, सामान्य प्रशासन विभागात नवी जबाबदारी
महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक, सनदी अधिकारी स्वाती योगेश म्हसे पाटील यांची राज्य शासनाने बदली केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.
स्वाती म्हसे पाटील यांची आता मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (१) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सांस्कृतिक विकास महामंडळातील त्यांच्या कार्यकाळानंतर आता त्यांच्यावर मंत्रालयातील प्रशासकीय चौकशी व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
Comments are closed.