बापरे! हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीसाठी आठ कोटींची झुंबड; 200 देशांतील क्रिकेट चाहत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फिफा विश्वचषकासाठी वर्षभर आधीपासूनच जगभरातील चाहत्यांमध्ये तिकिटांसाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळते. आता क्रिकेटनेही त्याच जागतिक लोकप्रियतेला गवसणी घातली आहे. 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे रंगणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप तिकिटांचे तब्बल 14 कोटी अर्ज आल्याने आयोजकही अवाक् झाले आहेत. विशेष म्हणजे हिंदुस्थान-पाकिस्तान महामुकाबल्यासाठीच तब्बल आठ कोटी अर्ज आल्याची माहिती स्पर्धेच्या संचालिका सारा एडगर यांनी दिली आहे

ही आकडेवारी केवळ क्रिकेटची लोकप्रियता दाखवणारी नाही, तर या खेळाने जागतिक मनोरंजनाच्या बाजारपेठेत किती मोठी झेप घेतली आहे, याची साक्ष देणारी आहे. जवळपास 200 देशांतील चाहत्यांनी तिकिटांसाठी अर्ज केले आहेत. 2 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2027 या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत 14 संघांमध्ये 57 सामने रंगणार आहेत. आफ्रिकेत 24 वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषकाचे पुनरागमन होत असल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान सामना 10 ऑक्टोबरला जोहान्सबर्ग येथे होणार आहे.

Comments are closed.