T20 World Cup चा धमाका सुरू असतानाच ICC क्रमवारीत मोठा उलटफेर; टॉप 10 मध्ये 4 हिंदुस्थानी फलंदाजांचा समावेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी फलंदाजांनी आपला रुतबा कायम ठेवला आहे. इशान किशन सध्या तुफान फॉर्मात आहे. सलग दोन सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावत विरोधी संघातील गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्याच्या विस्फोटक खेळीचा त्याला ICC फलंदाजांच्या क्रमवारीत फायदा झाला असून 17 स्थानांनी झेप घेत थेट आठव्या क्रमांकवर त्याने उडी मारली आहे.

अभिषेक शर्मा टी20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याची बॅट तळपली नाही. मात्र, याचा त्याच्या क्रमवारीवर काही परिणाम झाला नाही. 891 गुणांसह त्याने त्याने आपलं सिंहासन शाबूत ठेवलं आहे. दुसरीकडे तिलक वर्मानेही (751 गुण) क्रमवारीत एका स्थानाची आघाडी घेत पाचव्या स्थानावरून चौथे स्थान पटकावले आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवही अव्वल दहा फलंदाजांमध्ये सामील असून तो 747 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. या तीन फलंदाजांव्यतिरिक्त अव्वल दहामध्ये इशान किशनने एन्ट्री मारली आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध पार पडलेल्या टी20 मालिकेपूर्वी तो अव्वल 50 मध्येही नव्हता. मात्र, आता त्याचा समावेश थेट अव्वल दहा फलंदाजांमध्ये झाला आहे. 732 गुणांसह तो आठव्या क्रमांकावर आहे.

Ranji Trophy – अखेर 67 वर्षांचा वनवास संपला… जम्मू-कश्मीर पहिल्यांदाच रणजी करंडकाच्या फायनलमध्ये

Comments are closed.