ICC चा क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा निर्णय! 6 वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेट बोर्डाला अचानक केलं

ICC ने कॅनडा क्रिकेट बोर्डाला निलंबित केले आयपीएल 2026 चा थरार संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपल्या बोर्ड बैठकीत एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय ठरलेला निर्णय घेतला आहे. आयसीसीने कॅनडा क्रिकेट (Cricket Canada) या संस्थेची सदस्यता तत्काळ प्रभावाने निलंबित केली आहे. विशेष म्हणजे, कॅनडाची राष्ट्रीय क्रिकेट संघटना निलंबित करण्यात आली असली तरी कॅनडाच्या राष्ट्रीय संघांना आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आलेली नाही.

आयसीसीने का घेतला हा निर्णय? (Why ICC Suspends Canada Cricket Board)

आयसीसीच्या माहितीनुसार, क्रिकेट कॅनडाने सदस्यत्वाशी संबंधित काही गंभीर जबाबदाऱ्यांचे उल्लंघन केले आहे. यामुळे प्रशासन आणि कारभाराशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आयसीसी बोर्डाने कठोर भूमिका घेत कॅनडाच्या क्रिकेट संस्थेवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, आयसीसीने नेमक्या कोणत्या नियमांचे उल्लंघन झाले याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. विविध अहवालांनुसार, क्रिकेट कॅनडाच्या स्थानिक व्यवस्थापनात आणि प्रशासनात गंभीर त्रुटी असल्याची चर्चा सुरू होती.

खेळाडूंना दिलासा, विश्वचषक खेळण्यावर बंदी नाही (Canada Cricket Board)

आयसीसीने हा निर्णय घेताना कॅनडाच्या क्रिकेटपटूंना कोणताही अन्याय होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळे निलंबनाचा फटका थेट राष्ट्रीय संघाला बसणार नाही. याचा अर्थ असा की, निलंबनाच्या कालावधीतही कॅनडाचे पुरुष, महिला आणि युवा राष्ट्रीय संघ आयसीसीच्या अधिकृत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र राहतील. त्यामुळे आगामी आयसीसी स्पर्धांमध्ये कॅनडाचा सहभाग कायम राहणार आहे.

निधी मिळणार, पण आयसीसीच्या देखरेखीखाली (Canada Cricket Board News)

निलंबनानंतर क्रिकेट कॅनडाला आयसीसीकडून मिळणारा निधी पूर्णपणे बंद करण्यात आलेला नाही. मात्र, हा निधी आता आयसीसीच्या थेट देखरेखीखाली नियंत्रित पद्धतीने दिला जाणार आहे. हा निधी केवळ राष्ट्रीय संघांच्या कार्यक्रमांसाठी आणि क्रिकेटच्या विकासासाठीच वापरता येईल. यासाठी आयसीसी व्यवस्थापन आणि विशेष समिती संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे. आयसीसीने स्पष्ट केले आहे की, क्रिकेट कॅनडाला प्रशासन आणि सुशासनाशी संबंधित काही अटी पूर्ण कराव्या लागतील. त्या अटींची पूर्तता झाल्यानंतरच सदस्यत्व पुन्हा बहाल करण्याचा विचार केला जाईल.

यापूर्वी अमेरिकेवरही झाली होती कारवाई

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी क्रिकेट यूएसए (USA Cricket) वरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे उत्तर अमेरिकेतील क्रिकेट प्रशासनाबाबत आयसीसी अधिक कठोर भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

6 वेळा विश्वचषक खेळलेला कॅनडा (Canada Cricket ICC News)

कॅनडा हा सहयोगी सदस्य देशांमधील क्रिकेटमधील एक जुना आणि महत्त्वाचा संघ मानला जातो. कॅनडाने आतापर्यंत एकूण 6 ICC विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे.  कॅनडा 2024 आणि 2026 च्या टी-20 विश्वचषक संघांचा भाग होता. या संघाने चार एकदिवसीय विश्वचषकांमध्येही भाग घेतला आहे. कॅनडाने 1979, 2003, 2007आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकांमध्ये सहभाग घेतला होता. क्रिकेट कॅनडाला 1968 मध्ये आयसीसीचे सहयोगी सदस्यत्व मिळाले. त्यामुळे हा क्रिकेट इतिहासातील सर्वात जुन्या सहयोगी सदस्यांपैकी एक देश मानला जातो.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi VIDEO : काळा मास्क, चेहऱ्यावर टॉवेल अन् वैभवची लपूनछपून एन्ट्री!; एअरपोर्टवरील लूकची सोशल मीडियावर चर्चा

आणखी वाचा

Comments are closed.