ICC T20 World Cup 2026 – मिस्टर 360 च्या विक्रमाला क्विंटन डी कॉकने लावला सुरूंग, दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासात नोंद
ICC T20 World Cup 2026 मध्ये आज (11 फेब्रुवारी 2026) झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तान सामना रोमांचक, थरारक आणि अंगावर काटा आणनारा ठरला. दोन्ही संघांनी दिलेली कडवी झुंज पाहून चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला. दोन सूपर ओव्हर खेळल्या गेल्या आणि अखेरच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत सामना जिंकला. या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने इतिहास रचला आहे. त्याने एबीडिव्हिलियर्सचा विक्रम मोडीत काढला आहे.
क्विंटन डी कॉकने अफगाणिस्तानविरुद्ध 59 धावांची खेळी केली आणि विक्रम प्रस्थापित केला. या 59 धावांच्या मदतीने क्विंटन डी कॉक आता टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता. त्याने टी20 वर्ल्ड कपमध्ये 29 डावांमध्ये 717 धावा केल्या आहेत. मात्र, त्याचा हा विक्रम आता डी कॉकने मोडित काढला असून डी कॉकच्या नावावर आता 737 धावांची नोंद झाली आहे. 29 डावांमध्ये 26.23 च्या सरासरीने त्याने 737 धावा त्याने चोपून काढल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या 74 इतकी आहे.
Comments are closed.