थोडक्यात बातम्या – अमेरिकेत हिंदू, शीख नागरिकांविरोधात द्वेष वाढला; न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांची खंत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेत राहत असलेल्या हिंदू आणि शीख समुदायांविरोधात द्वेष वाढल्याचे दिसत आहे, अशी खंत न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी बोलून दाखवली. ममदानी हे आपल्या कार्यालयात आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमात बोलत होते. गेल्या वर्षभरात हिंदू मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आल्याने आपल्याला चिंता वाटत आहे, असे ते यावेळी म्हणाले.

जो द्वेष पूर्वी समाजाच्या काही भागांपुरता मर्यादित होता, तो आता निवडणुकीच्या राजकारणापर्यंत पोहोचला आहे. आपल्याला असे राजकारण नाकारावे लागेल, असे ममदानी म्हणाले.

मणिपुरात लष्कराच्या वाहनाला अपघात

मणिपूरमधील इम्फाळ जिह्यात बुधवारी लष्कराचे वाहन नदीत कोसळले. या अपघातात कॅप्टन हनुमान राम यांचा मृत्यू झाला असून जवान माली जयेश हिम्मत, राकेश सरपाटे आणि अखिलेश कुमार शाह हे तीन जवान जखमी झाले. आठव्या बिहार रेजिमेंटच्या जवानांना घेऊन जात असताना वाहनाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन थेट नदीत जावून कोसळले.

सोने-चांदीत सहाव्या दिवशीही घसरण

सोने आणि चांदीच्या किमतीत सलग सहाव्या दिवशी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 2 हजार 696 रुपयांची घसरण झाल्याने सोन्याचा दर प्रति तोळा 1 लाख 32 हजार रुपयांवर आला आहे. तर सोन्याप्रमाणे चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. चांदी 4 हजार 665 रुपयांनी घसरून 1.65 लाख रुपयांवर आली आहे.

पाकिस्तानी नागरिकाला शिक्षा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी नागरिक आसिफ मर्चंट याला 27 वर्षे सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो इराणसाठी काम करत होता. अमेरिकेतील एका नेत्याची हत्या घडवून आणण्यासाठी त्याने मारेकऱयांना पाच हजार डॉलर आगाऊ रक्कमही दिली होती.

Comments are closed.