मोठी बातमी: तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचं टोकाचं पाऊल, हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून दे

पुणे: संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिरीष महाराज मोरे (वय-30) यांनी आज सकाळी राहत्या घरात आपलं जीवन संपवलं आहे. घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात आणि वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. देहू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण समोर आलं आहे.शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता. त्यांचा नुकताच त्यांचा विवाह ठरला होता. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता.वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

देहूतील त्यांच्या राहत्या घरी शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली आहे. ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. काल रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळं दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं आहे. आर्थिक विवंचनेतुन हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोट मध्ये नमूद करण्यात आलं आहे. वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. ते प्रवचन आणि कीर्तन करायचे.

देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी टोकाचं पाऊत उचलत आपलं जीवन संपवलं आहे. आर्थिक विवंचनेतून त्याने हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता, तर 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता. मात्र, त्याआधीच ही घटना घडली आहे.

शिरीष महाराज मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधलेले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहतात. काल (मंगळवारी) रात्री मोरे वरील खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. म्हणून घरातील लोकांनी वरती रूमजवळ जाऊन दरवाजा वाजवला पण दार उघडले नाही. आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दार तोडलं. मात्र, मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

प्राथमिक माहितीनुसार आर्थिक विवंचेनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं कळतय. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी याबाबतची माहिती दिली. अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. दरम्यान, हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिरीष महाराज यांनी आपलं जीवन संपवण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील आहे. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे.

नितेश राणे यांनी वाहिली श्रद्धांजली

*संत तुकाराम महाराजांचे वंशज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मित निधन झाले*
*मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सदगती मिळो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना…*
*ॐ शांती*
*आत्मा श्रद्धांजली*

अधिक पाहा..

Comments are closed.