RAF ने पेलेट गनमधून 7 फैरी झाडल्या; 7 आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह 2 विद्यार्थी रक्तबंबाळ
रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात राऊंड फायर केले: रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी आंदोलकांवर झाडल्या, पाच फेऱ्या आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांवर वापरण्यात आलेल्या पेलेट गनमुळे एक डोळा निकामी झालेला विद्यार्थीच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समोर आणला होता. यानंतर केंद्रीय गृहमंत्री यांनाही राहुल गांधी यांनी याच मुद्यावरून घेरताना पत्र सुद्धा लिहिलं आहे.
सात फैऱ्यांपैकी पाच फेऱ्या आंदोलकांना लागल्या
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात तैनात असलेल्या एका रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या जवानाने आपल्या पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या असल्याचे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) चौकशीत समोर आले आहे. या सात फैऱ्यांपैकी पाच फेऱ्या आंदोलकांना लागल्या, तर दोन जमिनीवर आदळल्या. घटनेत किमान तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमींमध्ये इर्शाद शेख (25, साहिल लोचब (19 दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी) आणि ‘आऊटलूक’ मासिकाचा एक 28 र्षीय पत्रकार यांचा समावेश आहे. दुसरीकडे, सूत्रांच्या माहितीनुसार, आंदोलकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करून दगडफेक सुरू केल्यानंतर हे गोळीबार करण्यात आल्याचा दावा केला आहे.
नियम धाब्यावर बसवून फायरिंग?
दुसरीकडे, आरएएफच्या (RAF) महानिरीक्षक सीमा धुंधिया यांनी असे निरीक्षण नोंदवले की, गर्दी नियंत्रणासाठी वापरलेली बळाची ही पद्धत (force gradient) विहित मानकांनुसार आणि प्रशिक्षणाशी सुसंगत नव्हती. अंतर्गत पुनरावलोकनात गंभीर ‘ऑपरेशनल लॅप्स’ (कार्यपद्धतीतील त्रुटी) दिसून आल्या आहेत. 22 जुलै रोजी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की, बळाचा वापर केवळ आवश्यक असेल तेव्हाच आणि अत्यंत संवेदनशीलपणे केला जावा. तसेच, कोणतीही कठोर कारवाई करण्यापूर्वी इशारा देणे आणि लाठीचार्ज किंवा अश्रुधुरासारख्या पर्यायांचा वापर करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. सीआरपीएफचे (CRPF) महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, या संपूर्ण घटनेचे ‘पोस्ट-इव्हेंट असेसमेंट’ केले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Comments are closed.