रोहित-हार्दिक OUT…?; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, BCCI दिला अल्ट

भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (Ind vs Afg ODI Series) खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 14 जून रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना 17 जून रोजी लखनौ येथील एकाना स्टेडियमवर होईल. अखेरीस, मालिकेतील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 20 जून रोजी चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काल (19 मे) अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ (Team India ODI Squad Vs Afghanistan) जाहीर केला. 15 सदस्यीय भारतीय संघात शुभमन गिलची (Shubhman Gill) कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) उपकर्णधारपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र भारत आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Ind vs Afg ODI Series)

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला सीओईमध्ये हजर राहण्याचे निर्देश- (Rohit Sharma-Hardik Pandya vs AFG ODI Series)

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या तंदुरुस्तीबाबत (फिटनेसबाबत) प्रश्न उपस्थित झाले आहेत. बीसीसीआयने हार्दिक आणि रोहित या दोघांनाही ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (COE) येथे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन्ही खेळाडूंना आपली तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे. त्यानंतरच हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा आगामी एकदिवसीय मालिकेत सहभागी होण्यास पात्र ठरतील.

एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ- (Team India ODI Squad Vs Afghanistan)

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

IND vs AFG Test Series: पडिक्कल OUT, केएल, ऋषभ, कुलदीप IN…; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI

आणखी वाचा

Comments are closed.