पडिक्कल OUT, केएल, ऋषभ, कुलदीप IN…; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंड

भारत 11वी कसोटी खेळण्याची शक्यता अफगाणिस्तान: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना(Ind vs AFG Test Series) 6 जूनपासून न्यू चंदीगड येथे खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघात अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहला या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करेल. मानव सुथार, हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांसारख्या युवा खेळाडूंचा या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. (Ind vs Afg Test Series)

यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करणार? (India Probable Playing 11 1st Test Afghanistan)

केएल राहुलची आता भारताच्या कसोटी संघाच्या उपकर्णधारपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. केएल राहुल मधल्या फळीतही खेळला आहे, परंतु सलामीवीर म्हणून तो सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. त्यामुळे, अफगाणिस्तानविरुद्ध डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली जाऊ शकते.

देवदत्त पडिक्कल की साई सुदर्शन, कोणाला संधी मिळणार? (India Probable Playing 11 1st Test Afghanistan)

तिसऱ्या क्रमांकाच्या जागेसाठी दोन फलंदाजांमध्ये चुरशीची लढत आहे. देवदत्त पडिक्कल की साई सुदर्शन, यांपैकी कोणाला संधी मिळेल हे सांगणे कठीण आहे. दोघेही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार शुभमन गिल साई सुदर्शनला संधी देऊ शकतो, कारण तो या स्थानावर यापूर्वी खेळला आहे. दरम्यान, कर्णधार शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. फलंदाज ऋषभ पंत मधल्या फळीत पाचव्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. पंतने आयपीएल 2026 मध्ये चांगली कामगिरी केली नसली, पण तो कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आहे. त्यानंतर ध्रुव जुरेलला सहाव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. नितीश कुमार रेड्डी सातव्या क्रमांकावर, तर वॉशिंग्टन सुंदर आठव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. यानंतर गोलंदाजी विभागात कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा खेळताना दिसू शकतात.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- (India Probable Playing 11 1st Test Afghanistan)

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ- (team india test squad vs afghanistan)

सलामीवीर : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल.

फलंदाज: लोकेश राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल

यष्टिरक्षक-फलंदाज : ऋषभ पंत, ध्रुव जुरेल.

अष्टपैलू : नितिशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर,

फिरकीपटूः कुलदीप यादव, मानव सुतार, हर्ष दुबे.

वेगवान गोलंदाज : मोहम्मद सिराज, प्रसिद्ध क्रिष्णा, गुरनूर ब्रार.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक- (Ind vs Afg ODI And Test Schedule)

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एक कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जातील. कसोटी सामना 6 ते 10 जून या कालावधीत न्यू चंदीगड येथे खेळला जाईल. दरम्यान, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 14 जूनपासून सुरुवात होईल. पहिला एकदिवसीय सामना 14 जून रोजी धर्मशाला येथे, दुसरा 17 जून रोजी लखनौ येथे आणि अंतिम एकदिवसीय सामना 20 जून रोजी चेन्नई येथे खेळला जाईल.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Team India Schedule : IPL संपली, आता टीम इंडिया पुढे सर्वात मोठा चक्रव्यूह; आयर्लंड ते इंग्लंड… लागोपाठ 6 देशांचे दौरे, वाचा संपूर्ण Schedule

आणखी वाचा

Comments are closed.