89 धावा करणारा संजू सॅमसन नव्हे…; इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारने कुणाला दिले विजया
भारत विरुद्ध इंग्लिश उपांत्य फेरी T20 विश्वचषक 2026: टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत काल भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना (Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. या सामन्यासाठी भारताचा सलामीवीर संजू सॅमसनला (Sanju Samson) सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
संजू सॅमसनने सलग दुसऱ्या सामन्यात दमदार फलंदाजी केली. संजू सॅमसन यानं इंग्लंड विरुद्द 42 बॉलमध्ये 89 धावा केल्या. संजू सॅमसनच्या या धावांच्या जोरावर भारताला 253 धावा केल्या. मात्र सूर्यकुमार यादवने विजयाचे श्रेय गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाला दिले. (Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026)
चौथा #T20WorldCup मुंबईत इंग्लंड विरुद्ध निरपेक्ष धावसंख्येतील विजयानंतर भारतासाठी अंतिम सामना 💪
थरारक कृतीबद्दल अधिक वाचा 👉 https://t.co/WPnrajAt2G pic.twitter.com/lPbOgKfWW4
— ICC (@ICC) 5 मार्च 2026
इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमार यादव काय काय म्हणाला? (Suryakumar Yadav On Ind vs Eng)
संघाच्या मोठ्या धावसंख्येत संजू सॅमसनच्या 89 धावांच्या योगदानाचे सूर्यकुमार यादवने कौतुक केले. जेव्हा सॅमसन फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला नेमके काय करायचे आहे हे माहित होते. संघाला त्याच्याकडून त्या कामगिरीची आवश्यकता होती आणि त्याने दमदार कामगिरी केली. पण जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि इतर गोलंदाजांनी ज्या पद्धतीने सामना आमच्या बाजूने वळवला तो अविश्वसनीय होता. अक्षर पटेलने शानदार झेल घेतले. आमचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनाही काही श्रेय द्यायला हवे. क्षेत्ररक्षणात खेळाडू उत्तम प्रतिसाद देत आहेत आणि अतिरिक्त प्रयत्न करत आहेत, जे मैदानावर दिसून येत आहे, असंही सूर्यकुमारने यावेळी सांगितले. सामन्यादरम्यान मी खूप घाबरलो होतो. माझ्या हृदयाची गती कदाचित 160 ते 175 च्या दरम्यान होती. जेव्हा आम्ही मैदानावर उतरलो तेव्हा स्टेडियम सुमारे 80 टक्के भरले होते. आनंद आहे की, आमची प्रेक्षकांना बघण्यासाठी चांगला सामना दिला, असंही सूर्यकुमार यादव म्हणाला.
भारत आणि इंग्लंडचा सामना कसा राहिला? (Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026)
नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं 7 बाद 253 धावा केल्या होत्या. संजू सॅमसनला इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक यानं 15 धावांवर असताना जीवदान दिलं होतं. संजू सॅमसन यानं 89, इशान किशन यानं 18 चेंडूत 39 धावा केल्या. संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागिदारी केली. शिवम दुबेनं 25 बॉलमध्ये 45, हार्दिक पांड्यानं 12 चेंडूत 27 धावा केल्या. तिलक वर्मानं 7 चेंडूमध्ये 21 धावा केल्या. भारतानं आजच्या डावात 19 षटकार मारले. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 7 बाद 246 धावा केल्या आणि भारतानं 7 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.