IND Vs IRL – टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; वैभव सूर्यवंशीला अद्याप संधी नाही, कर्णधार काय म्हणाला?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यामध्ये आजपासून दोन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना बेलफास्ट येथे खेळवला जात आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत यजमानांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र, त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही.

कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा हा पहिलास सामना असल्यामुळे त्याच्या खेळाकडेही सर्वांच्या नजरा असणार आहेत. दरम्यान, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्याला वैभव सूर्यवंशीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्याने सांगितलं की, दुर्दैवाने वैभव सूर्यवंशी या सामन्यात खेळत नाहीये. योग्य वेळी त्याला संधी दिली जाईल असं अय्यर म्हणाला. वैभव सूर्यवंशीने IPL 2026 सह नुकत्याच पार पडलेल्या तिरंगी मालिकेत दमदार फलंदाजी केली आहे. टीम इंडिया-A मधून खेळताना त्याने तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात श्रीलंका-A संघाला चोपून काढत धावांची लयलूट केली होती. त्यामुळे आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात त्याचं आंतरराष्ट्रीय पदार्पण होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, त्याच्या पदार्पणासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाचा संघ

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा.

Comments are closed.