IND Vs NZ 1st Test – ‘नर्वस नाइन्टी’चा शिकार होऊनही शुभमन गिलने मोडला धोनीचा 12 वर्षे जुना विक्रम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानने पहिल्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. गोलंदाजांनी आपली भूमिका चोख पार पाडल्यानंतर फलंदाजांनीही न्यूझीलंडचा खरपूस समाचार घेतला. यशस्वी, केएल राहुल आणि ऋषभ पंतसह कर्णधार शुभमन गिलने दमदार फलंदाजी करत संघाला 118 धावांची आघाडी मिळवून दिली आहे. कर्णधार शुभमन गिलने संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केलीच. पण त्याचबरोबर हिंदुस्थानचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 12 वर्षे जूनी विक्रम मोडित काढला आहे.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिल ‘नर्वस नाइन्टी’चा शिकार झाला. मात्र, 98 धावांची धडाकेबाज खेळी करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. दुर्दैवाने त्याचे शतक हुकले असले, तरी या 98 धावांच्या खेळीद्वारे गिलने न्यूझीलंडमध्ये हिंदुस्थानी कर्णधाराच्या सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येच्या यादीत एमएस धोनीचा (68 धावा, 2014) 12 वर्षे जुना विक्रम मागे टाकला. या ऐतिहासिक कामगिरीसह शुभमन गिल आता न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या हिंदुस्थानी कर्णधारांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत मोहम्मद अझरुद्दीन (192 धावा – 1990 आणि 103 धावा – 1998) आणि सुनील गावसकर (116 धावा – 1976) हेच त्याच्या पुढे आहेत.

Comments are closed.