अक्षर, शिवम OUT, कुलदीप IN…; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल टीम इंडियाची Pl

भारत विरुद्ध न्यूझीलंड 2रा T20 टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन: न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना भारताने 48 धावांनी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना (Ind Vs NZ 2nd T20) रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल होण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली नाही, परंतु अभिषेक शर्माने नागपूरमध्ये जोरदार फटकेबाजी करत 35 चेंडूत 84 धावा ठोकल्या. दुसऱ्या टी-20 सामन्यात देखील संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) डावाची सुरुवात करतील.

तिलक वर्माच्या दुखापतीनंतर श्रेयस अय्यर भारतीय क्रिकेट संघात परतला आहे, परंतु त्याला पहिल्या टी-20 मध्ये संधी मिळाली नाही. रायपूरमधील दुसऱ्या टी-20 मध्ये श्रेयस अय्यर ईशान किशनची जागा घेऊ शकतो. टी-20 विश्वचषक लक्षात घेऊन श्रेयस अय्यरचे टी-20 संघात दीर्घकाळ अनुपस्थितीनंतर पुनरागमन झाले आहे. कर्णधार सूर्या आणि प्रशिक्षक गौतम गंभीर विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला संधी देऊ शकतात. भारताचा मधलाक्रम खूपच मजबूत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्याच्यानंतर हार्दिक पांड्या आणि नंतर रिंकू सिंग फलंदाजीसाठी उतरतील. (Ind Vs NZ 2nd T20)

शिवम दुबेची जागा कुलदीप यादव किंवा रवी बिश्नोई घेऊ शकतात- (Shivam Dube Kuldeep Yadav)

रायपूरची खेळपट्टी सामान्यतः फिरकीपटूंना अनुकूल असते. त्यामुळे शिवम दुबेची जागा कुलदीप यादव किंवा रवी बिश्नोई घेऊ शकतात. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा टी-20 गोलंदाज वरुण चक्रवर्ती उपकर्णधार अक्षर पटेलसह फिरकी विभागाचे नेतृत्व करेल. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजी सांभाळतील.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन- (Ind Vs NZ 2nd T20 Team India Playing XI)

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन/श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ- (Team India Squad vs New Zealand T20)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (पहिले तीन टी-20), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई.

संबंधित बातमी:

T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कोणते दोन संघ पोहोचणार? मायकल क्लार्कनं भारताचं नाव घेतलं, पाकिस्तान बद्दल म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.