मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या…’, भारत-न्यूझीलंड फायनलपूर्व

सूर्यकुमार यादव भारत वि NZ ICC T20 विश्वचषक फायनल 2026: सूर्यकुमार यादव हा दबावाखाली राहून खेळणाऱ्यांपैकी नाही. तो न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या अंतिम सामन्यात मोठी खेळी करेल, असा विश्वास सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) बालपणीचे प्रशिक्षक अशोक अस्वलकर यांनी व्यक्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात जेव्हा आम्हाला आत्मविश्वास होता, तेव्हा सूर्याचा दबाव आधीच निघून गेला होता. मी फक्त त्याला बोललो होतो, की फक्त शांत राहा. आजच्या सामन्यात त्याने संघाच्या गोलंदाजीत बदल करायला हवेत, असे मत अशोक अस्वलकर यांनी व्यक्त केले. ते रविवारी ‘एबीपी माझा’शी बोलत होते. (Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026)

मी लहानपणापासून सूर्याला पाहिले आहे. तो मोठ्या परिस्थितीत सर्वात जास्त उत्कृष्ट कामगिरी करतो. तो आज कर्णधाराची खेळी खेळेल आणि सर्वांना सांभाळेल. सूर्याने आधी धावा काढल्या नाहीत, परंतु न्यूझीलंड मालिकेतील त्याची कामगिरी पहा. त्याचे निकाल आज दिसतील. तेव्हा सूर्याच्या कामगिरीचा परिणाम दिसेल. आज, मला संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या दोघांकडूनही आशा आहे. दोघेही काहीतरी मोठे करतील. स्टेडियमबद्दलच्या चर्चेचा खेळाडूंवर परिणाम होत नाही, परंतु त्यांनी ही द्विधा मनःस्थिती मोडण्यासाठी अधिक प्रयत्न केले, असे अशोक अस्वलकर यांनी म्हटले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी टी 20 विश्वषचक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी (Narendra Modi) मैदानात या सामन्याला सुरुवात होईल. मात्र, हे मैदान टीम इंडियासाठी काहीसे अनलकी असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आजच्या सामन्याविषयी धाकधूक आहे. परंतु, मोठ्या सामन्यांमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम वरील पराभवाची मालिका आज भारत खंडित करेल, असा विश्वास नागपूरमधील क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केला आहे. न्यूझीलंडविरोधात आजच्या बिग फायनलमध्ये भारताचा विजय होईल असा विश्वास टीम इंडियाच्या चाहत्यांना आहे. मोठ्या सामन्यांमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पराभवाचा पॅटर्न आज भारत मोडून काढेल आणि न्युझीलंडवर टीम इंडिया भारी पडेल, असा विश्वास नागपूरकर क्रिकेटच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे. अभिषेक शर्माचा वाईट फॉर्म चिंतेचा विषय असला, तरी संजू सॅमसन ती उणीव भक्कमपणे भरून काढत आहे. गोलंदाजीमध्ये इंग्लंडविरोधातील सेमी फायन मध्ये काहीशी अडचण झाली असली, तरी जसप्रीत बुमराहचा अनुभव किवीजला भारी पडेल, असा क्रिकेटप्रेमींना वाटत आहे.  दरम्यान नेहमीच भारतासाठी चिंतेचा विषय असलेला क्षेत्ररक्षण सध्या चांगल्यारीतीने होत असल्यामुळे फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्हीबाबतीत भारत न्यूझीलंडपेक्षा सरस ठरेल असा नागूपरमधील क्रिकेट चाहत्यांचा विश्वास आहे.

आणखी वाचा

भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.