टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तानविरुद्ध बहिष्काराचे वारे; गंभीरची खेळाडूंसोबत चर्चा
आयएनडी वि पाक एशिया कप 2025: आशिया कपमध्ये (Asia Cup 2025) आज दुबईत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात हायव्होलटेज क्रिकेट सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अलीकडेच बिघडले आहेत. त्यामुळे भारतातून अनेकांनी पाकिस्तानविरुद्धचा भारताचा सामना रद्द करावा, पाकिस्तानविरुद्ध भारताने खेळू नये, अशी मागणी होत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानूसार, भारताच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचे वारे वाहत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळावं की नाही? असा संभ्रम भारतीय क्रिकेटपटूंसमोरही आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर स्टाफसोबत खेळाडूंची चर्चा झाली. व्यावसायिक राहा आणि मॅचकडे मॅच म्हणून पाहा, असा सल्ला टीम इंडियातील खेळाडूंना देण्यात आला आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यापूर्वीची प्रशिक्षक किंवा कर्णधाराची पत्रकार परिषदही झालेली नाहीय.
विरोधकांकडून मोदी सरकारवर हल्लाबोल-
आशिया चषकमध्ये आज दुबईत भारत आणि पाकिस्तानदरम्यान मॅच होणार आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकीय सामना रंगलाय. ठाकरेंच्या शिवसेनेनं या मॅचला कडाडून विरोध केलाय. आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान यावर काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे शहिदांचा अपमान असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेेंनी केला. तसंच बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी औकातीत राहावं, असा इशाराही त्यांनी दिलाय. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं हॉटेल मालक आणि व्यावसायिकांना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हॉटेल्समध्ये न दाखवण्याची विनंती केलीय. यावेळी हीच देशभक्ती दाखवण्याची खरी वेळ असून, सामना न दाखवून राष्ट्रप्रेम सिद्ध करण्याचं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलंय.
भारताचा संपूर्ण संघ (India Full Squad): सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
पाकिस्तानचा संपूर्ण संघ (Pakistan Full Squad): सलमान आगा (कर्नाधर), अब्रार अहमद, फहीम अशरफ, फखर झमान, हॅरिस रौफ, हसन अली, हसन नवाझ, हुसेन तालत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (यशक), मोहम्मद नवाज, मोहम्मद नवाज, सॅहबदहद, शीबदाद सूफन शाह शाह.
https://www.youtube.com/watch?v=FSFHM8EXNFQ
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.