द. आफ्रिकेनं मालिका 2-0 नं जिंकली; भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव, गंभीर राजीनामा देण्या
भारत विरुद्ध एसए दुसरी कसोटी गौतम गंभीर: भारतविरुद्धच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका (India vs South Africa) दक्षिण अफ्रिकेने 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs SA 2nd Test) दक्षिण आफ्रिकेनं भारताला 408 धावांनी पराभूत केलं. 549 धावांचं आव्हान गाठताना भारत 140 धावांतच गारद झाला. धावांचा विचार करता भारताचा आजवरचा सर्वात मोठा पराभव आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेनं तब्बल 25 वर्षांनंतर भारतात (Team India) कसोटी मालिका जिंकली. भारताला मायदेशातच सलग दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये व्हाईटवॉशला सामोरं जायला लागलं. न्यूझीलंडनं 3-0 ने पराभूत केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही 2-0 ने हरवलं.
दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी ४०८ धावांनी जिंकली.
ते देखील क्लिंच #INDvSA कसोटी मालिका २-० ने.
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/Hu11cnrocG#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/NBSFW4xtxP
— BCCI (@BCCI) २६ नोव्हेंबर २०२५
दुसऱ्या गुवाहाटी कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. भारताच्या या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir)वर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. गौतम गंभीरने भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी घेतल्यानंतर रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर आता गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच काही नेटकरी दक्षिण अफ्रिकेविरुद्च्या पराभवानंतर गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
घरच्या कसोटी मालिकेनंतर कर्णधार आणि प्रशिक्षकाची परिस्थिती. 💔 pic.twitter.com/OQhGyOxemO
— मुफद्दल वोहरा (@mufaddal_vohra) २६ नोव्हेंबर २०२५
गौतम गंभीरच्या काळात टीम इंडियाची ‘गंभीर’ परिस्थिती- (Gautam Gambhir Team India)
- 36 वर्षांनी भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पराभवाचा धक्का.
- 19 वर्षांनी टीम इंडिया बंगलुरूच्या चिन्नास्वामीवर कसोटी हरली.
- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून मालिका गमवावी लागली.
- 12 वर्षांनी भारताला घरच्या कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला.
- 12 वर्षांनी टीम इंडिया मुंबईच्या वानखेडेवर कसोटी हरली.
- कसोटीमध्ये पहिल्यांदाच घरच्या मैदानावर 3-0 ने क्लीन स्वीप.
- 13 वर्षांनी मेलबर्नमध्ये कसोटी पराभव.
- 10 वर्षांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी हातची गेली.
- 12 वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने टेस्ट मालिकेत 3 सामने गमावले.
- पहिल्यांदाच टीम इंडिया WTC फायनलसाठी क्वालिफाय करू शकली नाही.
- लीड्सवर 5 शतकं करूनही कसोटी हरलेली जगातील पहिली टीम.
- लीड्समध्ये 92 वर्षांच्या कसोटी इतिहासात भारत फक्त दुसऱ्यांदा 350+ धावांचं बचाव करण्यात अपयशी.
- 124 धावांचं लक्ष्यही गाठता आलं नाही, हे भारताचं घरच्या मैदानावर सर्वात कमी लक्ष्य अपयश.
- 25 वर्षांनी भारताला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून पराभव.
प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी कठीण काळ…!!!! pic.twitter.com/Z00RaCmDCZ
– जॉन्स. (@CricCrazyJohns) २६ नोव्हेंबर २०२५
भेट कशी झाली? (भारत वि एसए दुसरी कसोटी)
पहिल्या डावात 288 धावांची दमदार आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं दुसरा डाव 260/5 वर घोषित केला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 549 धावांचं लक्ष्य ठेवलं गेलं. दुसऱ्या डावात ट्रिस्टन स्टब्स 93 धावांनी शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. त्याचा विकेट पडताच बावुमानं डाव घोषित केला. आणि दुसऱ्या डावात भारताला 140 धावांत गुंडाळले आणि 408 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा कसोटीतील आणि घरच्या मैदानावर धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव आहे. याआधी 2004 मध्ये नागपुरात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने 342 धावांनी पराभव केला होता.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.