IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत विराट कोहलीच्या फलंदाजीचा क्रमांक बदलणार? गिल-गंभीरची योजना काय

भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team) वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना 27 नोव्हेंबरला खेळणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill & Head Coach of Team india Gautam Gambhir) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी योग्य प्लेइंग इलेव्हन निवडणे आव्हानात्मक ठरणार आहे. दरम्यान, संघ व्यवस्थापन दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) फलंदाजीचा क्रमांक बदलण्याचाही विचार करत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या निर्णयाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) मध्ये सहभागी होणार असल्याने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे भारतीय संघाच्या टॉप-4 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार शुबमन गिलने यशस्वी जयस्वालला (Yashsvi Jaiswal) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्याचा निर्णय घेतला, तर विराट कोहलीचा फलंदाजीचा क्रमांकही बदलू शकतो. रिपोर्ट्सनुसार, संघ व्यवस्थापन यशस्वी जयस्वालला संधी देण्याच्या विचारात आहे.

यशस्वी जयस्वाल खेळल्यास त्याला रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) सलामीला पाठवले जाऊ शकते. त्यामुळे कर्णधार शुबमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागू शकते. सलामीचा फलंदाज असल्याने गिलला मधल्या फळीत फलंदाजी करणे पसंत नसेल. अशा परिस्थितीत विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागू शकते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहली (Virat Kohli) या निर्णयाशी सहमत नसून त्याला तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करायची आहे.

अंतिम क्षणी संघ व्यवस्थापनाने टॉप-3 मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला, तर चौथ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी दिली जाऊ शकते. गायकवाडने मागील डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत भारतीय संघासाठी शतक झळकावले होते. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्यालाही संधी देऊ शकतात. मात्र, चौथ्या क्रमांकासाठी नमन धीरही आपला दावा मजबूत करत आहे. गरज पडल्यास तो काही षटके गोलंदाजीही करू शकतो.

भारतीय क्रिकेट संघाला या मालिकेत काही निर्णय आयसीसी वनडे विश्वचषक 2027 (Odi WC 2027) डोळ्यासमोर ठेवून घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे या मालिकेतही यशस्वी जयस्वालला संधी मिळाली नाही आणि ऋतुराज गायकवाडने धावा केल्या, तर भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. ऋतुराज गायकवाड सलामीपासून ते पाचव्या क्रमांकापर्यंत कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्यामुळे त्याची ही शैली संघासाठी भविष्यातही फायद्याची ठरू शकते.

Comments are closed.