IND vs WI 1st T20I: पहिल्या षटकात अभिषेकचा झंझावात, रोहितचा रेकॉर्ड गडगडला! भारतासाठी सर्वाधिक षटकार

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला टी२० सामना मंगळवारी (६ ऑक्टोबर) लखनऊ येथे खेळला गेला, जो भारताने कर्णधार श्रेयस अय्यरच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर ८ विकेट्सने जिंकला. या सामन्यात विंडीजने भारताला १७१ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते. भारताने हे लक्ष्य १४.४ षटकातच गाठले, मात्र याचा पाठलाग करताना यजमान संघाची सुरूवात चांगली झाली नाही. भारताचे सलामीवीर संजू सॅमसन (११ धावा) आणि अभिषेक शर्मा (२१ धावा) लवकर परतले. तरी अभिषेकच्या त्याच्या या छोट्या खेळीत माजी कर्णधार रोहित शर्माचा मोठा विक्रम उद्ध्वस्त केला.

अभिषेकने १० चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने २१ धावा केल्या. त्याने हा षटकार भारताच्या डावाच्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मारला आणि रोहितला मागे टाकले. अभिषेक आता भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला.

अभिषेकने आतापर्यंत टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पहिल्या षटकात १६८ चेंडू खेळताना १३ षटकार मारले आहेत. रोहितने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पहिल्या षटकात ४०१ चेंडूंचा सामना करताना १२ षटकार मारले होते. तसेच या यादीत इशान किशन ८ षटकारांसह (११४ चेंडू) तिसऱ्या आणि संजू सॅमसन ७ षटकारांसह (११० चेंडू) चौथ्या स्थानावर आहे.

सामन्याची स्थिती
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यामधून नमन धीरचे टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. त्याने ४ षटकांत ३१ धावा देत ३ विकेट्स घेतला. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ १९.१ षटकांत १७१ धावसंख्येवर सर्वबाद झाला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची स्थिती ३.३ षटकांत ३५ धावसंख्येवर दोन विकेट अशी होती. अभिषेक धोकादायक दिसत असताना रोस्टन चेजने त्याला बाद केले. त्यानंतर श्रेयरने इशानसोबत संघाचा डाव सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६७ चेंडूंत १३७ धावांची भागीदारी केली. इशान ३७ धावा आणि श्रेयस १०२ धावांवर नाबाद राहिले. (IND vs WI Lucknow T20I: Abhishek Sharma breaks Rohit Sharma’s record, most sixes for India in 1st Over)

Comments are closed.