विराट कोहलीच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचे चार वर्ल्ड रेकॉर्ड्स! वेस्ट इंडिजने सावधगिरी बाळगणे आवश्यक

विराट कोहली शतकांचे महाशतक करणार की नाही हे जाणून घ्यायची सर्वांना उत्सुकता आहे. आतापर्यंत भारताच्या माजी कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 85 शतके झळकावली आहेत. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी यांमधून निवृत्ती घेतली असून तो भारतासाठी केवळ एकदिवसीय सामने खेळतो.

2027 च्या विश्वचषकापर्यंत भारताला अजून बरेच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. त्यामुळे विराट 100 शतके पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. भारत घरच्या मैदानावर 27 सप्टेंबरपासून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी दोन्ही संघ जाहीर झाले आहेत. या मालिकेदरम्यान विराटला सचिन तेंडुलकरच्या चार आणि इतर अनेक विक्रम मोडण्याची संधी आहे. ते कोणते, हे जाणून घेऊ.

विराटला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ 59 धावांची गरज आहे. हा टप्पा गाठणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरेल. हा जागतिक विक्रम सध्या सचिनच्या नावावर आहे. त्याने एकदिवसीयच्या 377 डावांमध्ये 15000 धावांचा टप्पा गाठला होता, तर विराटने आतापर्यंत केवळ 302 डाव खेळले आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्ध दोन शतके करताच विराट अनेक विक्रम मोडेल. तो या संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरेल.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक 60 शतकांचा विश्वविक्रम सचिनच्या नावावर आहे. या यादीत विराट 59 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन शतके केली तर सचिनचा विक्रम मोडला जाईल.

तसेच विराट (41) घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके मोडण्यापासून केवळ दोन शतके दूर आहे. हा विक्रमही सचिनच्या नावावर असून त्याने 42 शतके केली आहेत.

घरच्या मैदानावर सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याचा विश्वविक्रम सचिनच्याच नावावर आहे. त्याने 6976 धावा केल्या असून विराटने 6867 धावा केल्या आहेत. यामुळे विराटला सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी केवळ 110 धावांची आवश्यकता आहे.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदीज करताना एकदिवसीय सामन्यांमध्ये 13,000 धावा करणारा पहिला खेळाडू बनण्यासाठी विराटला 180 धावांची आवश्यकता.

विराटने 314 एकदिवसीय सामन्यांमध्ये 58.59 च्या सरासरीने 14,941 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 54 शतके आणि 79 अर्धशतकांचा समावेश आहे.

Comments are closed.