अक्षर पटेल IN; वॉशिंग्टन सुंदर OUT, झिम्बाब्वेविरुद्ध Playing 11 मध्ये बदल निश्चित, गावसकरांनी

मुंबई: टी-20 विश्वचषकातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी झालेल्या पराभवानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या फलंदाजीवर कठोर शब्दांत टीका केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या डावातून धडा घ्यायला हवा होता; मात्र संघ अतिआत्मविश्वासाने मैदानात उतरला आणि प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात विकेट्स गमावल्या, असे गावसकर यांनी म्हटलं आहे.(IND VS ZIM T 20 World Cup 2026)

दक्षिण आफ्रिकेने भारताची सलग 12 सामन्यांची अपराजित मालिका खंडित करत 187/7 अशी धावसंख्या उभारली. सुरुवातीला विकेट्स गमावल्यानंतर डेव्हिड मिलर (David Miller) आणि डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) यांनी 97 धावांची भागीदारी करत डाव सावरला. “ब्रेविस आणि मिलर यांनी ज्या पद्धतीने संयम ठेवत भागीदारी उभारली, त्यातून भारतीय फलंदाजांनी शिकायला हवे होते,” असे गावसकर यांनी ‘जिओस्टार’वर बोलताना म्हटले आहे. (IND VS ZIM T 20 World Cup 2026)

भारताचा डाव मात्र 18.5 षटकांत अवघ्या 111 धावांवर आटोपला. पॉवरप्लेमध्येच इशान किशन (Ishan Kishan) (0), अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) (15) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) (1) माघारी परतल्याने भारत 26/3 अशा अडचणीत सापडला. आवश्यक धावगती सुमारे 9.5 होती, 15 नव्हती; त्यामुळे संयम राखणे गरजेचे होते, असे गावसकर यांनी नमूद केले. तिळक वर्माकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा होती; मात्र तोही अपयशी ठरला, अशी खंत गावसकर यांनी व्यक्त केली आहे.

“टी-20 क्रिकेटमध्ये प्रत्येक पॉवरप्लेमध्ये 70 धावा करणे आवश्यक नसते. 55-60 धावाही भक्कम पायाभरणी ठरू शकल्या असत्या. पण बेफिकीर फटकेबाजीमुळे भारताचा डाव कोसळला,” असेही गावसकर यांनी म्हटलं आहे.  “भारतीय फलंदाज अतिआत्मविश्वासाने मैदानात उतरले, प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्याच्या प्रयत्नात विकेट्स गमावल्या. टी- क्रिकेट असे खेळले जात नाही,” असे गावसकर यांनी म्हटले. तिलक वर्मा हा हुशार फलंदाज असला तरी त्याने अधिक संयम दाखवून भागीदारी उभारायला हवी होती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (IND VS ZIM T 20 World Cup 2026)

पुढील सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना संघरचनेत बदल करण्याबाबतही गावसकर यांनी मत व्यक्त केले. अक्षर पटेल (Axar Patel) याला पुन्हा अंतिम अकरात स्थान द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याचा पुरेसा उपयोग होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अर्षदीप सिंग (Arshdeep Singh) चांगल्या लयीत असल्याने त्याच्यात बदल होण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (IND VS ZIM T 20 World Cup 2026)

आणखी वाचा

Comments are closed.