IND vs ZIM – कुलदीप यादववर पुन्हा अन्याय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षावरून निर्माण झालेला वाद अधिकच गडद झाला आहे. इंग्लंड दौऱ्यामधील टी-२० मालिकेतून विश्रांती दिल्यानंतर कुलदीपला तिन्ही एकदिवसीय सामन्यांसाठी संघाबाहेरच ठेवण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध केलेल्या या महत्त्वाच्या फिरकी गोलंदाजाला पुन्हा एकदा बेंचवर बसण्यास भाग पाडले जात आहे.

कुलदीपच्या जागी अष्टपैलू खेळाडूंना स्थान…

भारतीय संघ व्यवस्थापन गोलंदाजीपेक्षा फलंदाजीला अधिक प्राधान्य देत आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये प्राधान्य दिले जात आहे. अक्षर आणि वॉशिंग्टन यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीने संघात आपले स्थान सार्थ ठरवले असले तरी, कुलदीपच्या उत्कृष्ट गोलंदाजी क्षमतेकडे दुर्लक्ष केले जात आहे; पण बाकीच्या गोलंदाजांना फलंदाजी येत नसतानाही त्यांना संघात कसे स्थान दिले जाते याकडे चाहते लक्ष वेधत आहेत.

मोहम्मद कैफने निवृत्तीची मागणी केली

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने कुलदीप यादवला संघातून वारंवार वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही कुलदीप यादवला संधी न मिळाल्याने, कैफने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार हल्ला चढवला. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना कैफ म्हणाला की, जर संघ व्यवस्थापन कुलदीपकडे दुर्लक्ष करत राहिले तर त्या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करावा.

IND vs ZIM – मालिकेपूर्वीच झिम्बाब्वेच्या कर्णधाराचा टीम इंडियाला इशारा

Comments are closed.