इंदापुरात राष्ट्रवादीत बंडखोरी! गारटकर भरणार उमेदवारी अर्ज, भाजप शरद पवार गट शिवसेनेचा पाठिंबा
Indapur Nagarpalika Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत. काही भागात महायुती एकत्र लढत आहे तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर महाविका आघाडी देखील काही ठिकाणी एकत्र आणि काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. अशातच इंदापूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन इंदापूरमध्ये निवडणूक लढणार
राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन इंदापूरमध्ये निवडणूक लढणार असल्याचे प्रदीप गारटकर यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर हे जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन उद्या इंदापूर नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरणार आहेत. पक्षाला त्यांनी दोन दिवसापूर्वी इशारा दिला होता. पंरतू पक्षाने त्याच्या सूचनेचा विचार न केल्याने त्यांनी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष संघटनेला आपली गरज वाटत नाहीत. आता ज्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिले आहे, त्याचा अजून पक्षात प्रवेश देखील झाला नाही असे प्रदीप गारटकर यांनी म्हटलं आहे.
लोकांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढणार – प्रदीप गारटकर
सर्वसामान्य कार्यकर्ते यांना आपण संधी देऊ असे मत पक्षाने मांडले होते. पंरतु तरीदेखील भरत शहा यांना उमेदवारी दिली. त्यावरुन आता लोकांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढणार असल्याचे गारटकर यांनी सांगितले. पक्ष सोडताना त्यांनी दत्तात्रय भरणे यांच्या कामकाजावर निशाणा साधला आहे. मला पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला हे देऊ ते देऊ असे सांगितले, परंतू, मी सर्वसामान्य कार्यकर्ते टिकवणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं मी राजीनामा द्यायचा ठरवले आहे. मला राष्ट्रवादी शरद पवार गट, भाजप आणि शिवसेनेचा पाठिंबा आहे. मी 100 टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्यात 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला! खासदार प्रणिती शिंदेंनी केली घोषणा, उमेदवारी अर्जही दाखल
आणखी वाचा
Comments are closed.