दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन,संयम तुटला, स्वत:ला कोंडले


पुणे : एखाद्या व्यक्तीची सहनशीलता संपल्यानंतर माणूस मर्यादा ओलांडून पुढे जातो, तसाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात घडला आहे. येथील अपंग बांधवांनी प्रशासनाविरुद्ध संतप्त होऊन चक्क भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकल्याचं पाहायला मिळालं. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कुलूप काढण्यात आलं आहे, मात्र मागण्यांवरती आंदोलक ठाम आहेत. दरम्यान, आंदोलकांनी (Agitation) कार्यालयास टाळे ठोकल्यानंतर स्वत:लाही कार्यालयातच कोंडून घेतले होते.

पुरंदर तालुक्यातील वीर परिंचे आणि राऊतवाडी या भागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमीन संपादन होऊनही अद्याप सातबारा न मिळाल्याने दाबा संघटनेच्या नेत्या सुरेखा ढवळे यांनी आज भूमि अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकून स्वतःसह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कोंडून घेतले. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे मागील 30 वर्षापासून पाठपुरावा करून देखील त्यांना त्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे दिले जात नाहीत. तीन महिन्यापूर्वी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून तीन महिन्यात सातबारा दिले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ते देखील पाळले गेले नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या दाबा संघटनेच्या अपंग बांधवांनी भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कुलूप काढण्यात आलं आहे, मात्र मागण्यांवरती आंदोलक ठाम आहेत.

हेही वाचा

शिंदेंच्या शिवसेनेचा 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार

आणखी वाचा

Comments are closed.