पुण्यात वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थिनीने वसतिगृहात संपवलं जीवन; तरुणी राजस्थानची असल्याची

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका  23 वर्षीय तरुणीने काल (मंगळवारी, ता, 5) रात्री वसतिगृहातील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

ज्योती कृष्णकुमार मीना (वय 23, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ज्योती ही मूळची राजस्थान येथील आहे. ती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती कॉलेजच्या वसतिगृहामध्ये राहत होती. मंगळवारी रात्री तिने एका मोकळ्या खोलीमध्ये गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. घटनेची माहिती समजताच सहकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. ती नैराश्यात होती, अशी माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती बंडगार्डन पोलीसांनी दिली आहे.

बी जे वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेऊन डॉक्टर होऊ पाहणाऱ्या ज्योती कृष्णकुमार मीनाने माननिक तणावामुळे आत्महत्या केल्याची माहिती आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीतच तिने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने खळबळ उडाली. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घटना उघडकीस आली. ज्योतीला मानसिक आजाराची ट्रीटमेंट सुरु होती, अशीही माहिती आहे.

आणखी वाचा

Comments are closed.