तिरंगी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; तिलक वर्मा कर्णधार, रियान पराग उपकर्णधार, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही संधी

इंडियन प्रीमियर लीगचा 19 वा हंगाम रंगात आलेला असतानाच भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ अर्थात बीसीसीआयने जून 2026 मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी वन डे मालिकेसाठी ‘इंडिया ए’ संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी निवड समितीने तरुण खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तिरंगी मालिकेमध्ये तिलक वर्मा हिंदुस्थानचे नेतृत्व करणार असून रियान परागकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी यालाही संधी देण्यात आली आहे. आयपीएल 2026 आणि अंडर-19 वर्ल्डकपमध्ये त्याने केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्याला ‘इंडिया ए’ संघात स्थान मिळाले आहे. तसेच पंजाब किंग्सचा आक्रमक सलामीवीर प्रियांश आर्य यालाही पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. याशिवाय आयुष बदोनी, निशांत सिंधू आणि हर्ष दुबे यांसारख्या तरुण खेळाडूंनी आयपीएल 2026 मधील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर संघात स्थान पक्के केले आहे.

दरम्यान, ही तिरंगी मालिका श्रीलंकेतील दांबुला येथे खेळवली जाईल. यात ‘इंडिया ए’, ‘श्रीलंका ए’ आणि ‘अफगाणिस्तान ए’ हे तीन संघ आमनेसामने असतील. एकदिवसीय मालिकेनंतर ‘इंडिया ए’ संघ ‘श्रीलंका ए’ विरुद्ध गॉलमध्ये दोन ‘मल्टी-डे’ सामनेही खेळणार आहे. या सामन्यासाठी स्वतंत्र संघाची घोषणा नंतर केली जाईल.

तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

9 जून 2026 – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ
11 जून 2026 – इंडिया ए वि. अफगाणिस्तान ए
13 जून 2026 – अफगाणिस्तान ए वि. श्रीलंका ए
१५ जून २०२६ – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ
17 जून 2026 – इंडिया ए वि. अफगाणिस्तान ए
19 जून 2026 – अफगाणिस्तान ए वि. श्रीलंका ए
21 जून 2026 – अंतिम सामना

'इंडिया ए' असोसिएशन

टिळक वर्मा (कर्ंधर), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकरंधर), आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), विपराज निगम, युवराज सिंह, अरविंद सिंह, अरविंद सिंह, अनिल सिंह. खान.

Comments are closed.