विराटचे एक शतक आणि रोहित-बटलरसह अनेक खेळाडूंचे रेकॉर्डस केले उध्वस्त; जाणून घ्या सविस्तर
गेल्या २ सामन्यांमध्ये लागोपाठ शून्यावर बाद झाल्यानंतर अखेर विराट कोहलीला फॉर्म गवसला. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १ धाव पूर्ण करताच शतक पूर्ण केल्यासारखं सेलिब्रेशन केलं. मात्र शतक पूर्ण केल्यानंतर त्याने सेलिब्रेशन करणं टाळलं. रायपूरच्या मैदानावर चेजमास्टर विराट कोहलीचं रौद्ररूप पाहायला मिळालं. विराटने धावांचा पाठलाग करताना नाबाद १०५ धावांची खेळी केली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला दमदार विजय मिळवून दिला. यादरम्यान शतक झळकावताच विराटने काही रेकॉर्ड मोडून काढले आहेत. कोणते आहेत ते रेकॉर्ड? जाणून घ्या.
विराटने या सामन्यात फलंदाजी करताना ६० चेंडूत १०६ धावांची शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने विजय मिळवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. या शतकी खेळीसह विराट कोहली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारतीय फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळेस सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा रेकॉर्ड हा रोहित शर्माच्या नावे होता. आता विराटने या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. दोघांनी २१-२१ वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे.
हे शतक पूर्ण करताच विराट कोहलीने जोस बटलरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. याआधी २ वेगवेगळ्या संघाविरुद्ध २ शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा बटलरच्या नावावर होता. आता विराट कोहलीने देखील २ संघाविरुद्ध २ शतकं झळकावली आहेत.
जोस बटलर हा एकमेव फलंदाज होता ज्याने धावांचा पाठलाग करताना ३ शतकं झळकावली होती. आता कोहलीने देखील इतकीच शतकं झळकावली आहेत. या रेकॉर्डमध्ये विराटने जोस बटलरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये विराटने डेव्हिड वॉर्नरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये विराट तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. विराट आणि वॉर्नरने प्रत्येकी १०-१० शतकं झळकावली आहेत. अव्वल स्थानी असलेल्या ख्रिस गेलने २२ शतकं झळकावली आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या बाबर आझमने १३ शतकं झळकावली आहेत.
Comments are closed.