भारत-विडींज संघांनी मिळून रचला इतिहास! टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दुसऱ्यांदाच घडले 'असे'
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसऱ्या टी20 सामन्याआधी रांचीमध्ये चार टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले, ज्यामध्ये एकाही संघाने 200 पेक्षा अधिक धावा केल्या नव्हता. शुक्रवारी (9 ऑक्टोबर) मात्र त्याच ठिकाणी 250 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग झाला. वेस्ट इंडीजने ही कामगिरी केली. त्यांच्याकडून कर्णधार शाय होपने नाबाद शतकी खेळी केली.
या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडून अनेक वैयक्तिक विक्रम रचले. मात्र हा सामना एका विशेष कारणामुळे लक्षात राहिला, ज्याला दोन्ही संघ कारणीभूत आहेत. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच दोन्ही संघांनी मिळून एका सामन्यात 500 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या.
या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. भारताने संजू सॅमसनच्या 82 धावा (41 चेंडू) , इशान किशनच्या 43 धावा (22 चेंडू), कर्णधार श्रेयस अय्यरच्या 40 धावा (18 चेंडू) आणि तिलक वर्माच्या नाबाद 44 धावा (18 चेंडू) ) या कामगिरीमुळे 20 षटकांत 5 विकेट्स गमावत 249 धावसंख्या उभारली होती.
वेस्ट इंडीजने याचा यशस्वी पाठलाग केला. त्यांनी 18.3 षटकांत 4 विकेट्स गमावून 252 धावा केल्या. त्यामुळे दोन्ही संघांनी मिळून एकूण 501 धावा केल्या. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा इतिहास पाहिला तर, आतापर्यंत केवळ दुसऱ्यांदाच दोन्ही संघांनी मिळून 500 धावसंख्येचा आकडा पार केला.
2009मध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघांनी मिळून 517 धावा केल्या होत्या. आता वेस्ट इंडिज आणि भारत यांनी मिळून रांची टी20 सामन्यात 501 धावा केल्या.
पुरुष T20I सामन्यांमधील सर्वाधिक एकूण धावा
517 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज, सेंच्युरियन, 2023
501 – भारत विरुद्ध वेस्ट इंडीज, रांची, 2026
499 – भारत विरुद्ध इंग्लंड, मुंबई (T20 विश्वचषक 2026 उपांत्य सामना)
496 – भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिरुवनंतपुरम, 2026
489 – वेस्ट इंडीज विरुद्ध भारत, लॉडरहिल, 2016
वेस्ट इंडीजने धावांचा पाठलाग करताना रचला इतिहास
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात केवळ एकदाच 250 पेक्षा अधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग झाला आहे. 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजने दिलेल्या 258 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता. सेंच्युरीयन येथे खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात यजमान संघाने 18.5 षटकांत 4 विकेट्स गमावत लक्ष्य गाठले होते.
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघांच्या यादीत वेस्ट इंडीज आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्यांनी भारताविरुद्ध 250 धावसंख्येचे लक्ष्य गाठले.
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये यशस्वीरीत्या गाठलेली सर्वोच्च लक्ष्ये (पुरुष)
२५९ – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज, सेंच्युरियन, 2023
250 – वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, रांची, 2026*
२४४ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड, 2018
२४४ – बल्गेरिया जिब्राल्टर विरुद्ध, सोफिया, 2025
२४३ – बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, सोफिया, 2022
२३२ – वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2015
230 – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मुंबई (वानखेडे), 2016
(भारत आणि वेस्ट इंडिजने दुसऱ्या T20I मध्ये एकत्रितपणे 501 धावा केल्या, पुरुषांच्या T20I मध्ये 2रा सर्वोच्च सामना-एकत्रितांचा विक्रम)
Comments are closed.