15 सुवर्णपदके हातातून निसटली; हिंदुस्थानी पथकाचा शतक महोत्सव साजरा होण्याची शक्यता कमीच

हिंदुस्थानने बुधवारी एका दिवसात चार सुवर्णपदके जिंकत पदकांचा आकडा दहापर्यंत नेला. तिरंदाजांच्या भन्नाट कामगिरीने हिंदुस्थाननेही जबरदस्त कामगिरी केली असली तरी हांगझोऊत कमावलेले तब्बल 15 सुवर्ण पदके हातातून निसटल्याचे दुःख लपवता येणार नाही. गतवेळेच्या 28 पैकी 25 सुवर्णपदकांच्या लढती झाल्या आहेत. आता केवळ तीन शिल्लक आहेत. तीन दिवसांत सुवर्णपदकांचा आकडा वीसपर्यंतही जाऊ शकतो, पण ही सुवर्ण गमावल्याचे दु:ख विसरता येणार नाही.

हांगझोऊ 2023 मध्ये हिंदुस्थानने ऐतिहासिक 28 सुवर्ण जिंकली होती. नागोयात आतापर्यंत त्यातील केवळ सहा विजेतेपदे राखण्यात यश आले, तर चार नव्या प्रकारांत सुवर्ण मिळवत आतापर्यंत झालेले नुकसान काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र आता कितीही चमत्कार झाले तरी हांगझोऊमध्ये गाठलेला पदकांचा शतकी आकडा यावेळी नक्वदीपर्यंत पोहोचणेही कठीण मानले जात आहे. हिंदुस्थानने 10 सुवर्णांसह 64 हा आकडा गाठला आहे.

हिंदुस्थानला सर्वात मोठा धक्का बसला तो नेमबाजीत. हांगझोऊत सात सुवर्णांची लयलूट करणाऱया नेमबाजांना त्या सातपैकी एकही सुवर्ण राखता आलेले नाही. अनेक ठिकाणी नेम पदकावर लागला, पण सोन्याच्या मध्यबिंदूवर नाही! यंदा नेमबाजीत नीरू धांडाचे महिला ट्रप, नीरू-कायननचे मिश्र ट्रप आणि सुरुची सिंह-कमलजीतचे मिश्र 10 मीटर एअर पिस्तूल अशी नवी सुवर्ण मिळाली, पण ती हांगझोऊतील सात सुवर्णपदकांची पुनरावृत्ती करू शकले नाहीत.

अॅथलेटिक्सनेही हांगझोऊच्या सुवर्णस्मृतींना धक्का दिला. पुरुष भालाफेकमध्ये सुवर्णाऐवजी रौप्य, पुरुष गोळाफेकीत रौप्य, तर महिला 5000 मीटरमध्ये कांस्य मिळाले. बॅडमिंटन पुरुष दुहेरी आणि इक्वेस्ट्रियन टीम ड्रेसाजमध्ये जुना पदकही जिंकता आलेला नाही. त्यामुळे आजच्या चार सुवर्णांचा आनंद मोठा असला तरी आकडे आरसा दाखवत आहेत की नागोयात नवे सोने सापडतेय, पण हांगझोऊचे जुने सोने हातातून वेगाने निसटले आहे.

या क्रीडा प्रकारात मुपुट राखले

महिला क्रिकेट, पुरुष कबड्डी, महिला कबड्डी, महिला कंपाऊंड तिरंदाजी संघ, पुरुष कंपाऊंड तिरंदाजी संघ, कंपाऊंड मिश्र संघ.

nagoyat नऊ सोने

नीरू धांडा (महिला गट),

नीरू धांडा-कायनन चेनई (मिश्र गट)

सुरुची सिंग-कमलजीत (१० मीटर एअर पिस्तूल मिश्र), किरण पहल, पूवम्मा, प्राची चौधरी, विथ्या रामराज (महिला ४x४०० मीटर रिले).

सोनं गेलं, पण पदक वाचलं

पुरुष 10 मी. एअर रायफल संघ ः रौप्य

पुरुष 50 मी. रायफल 3 पी संघ ः रौप्य

महिला 50 मी. रायफल 3 पी संघ ः रौप्य

पुरुष गोळाफेक ः रौप्य

पुरुष भालाफेक ः रौप्य

महिला 5000मी: कांस्य

नेम चुकला पुठे?

हांगझोऊ 2023 ः नेमबाजीत 7 सुवर्ण

नागोया 2026 ः सातपैकी एकही सुवर्ण राखता आले नाही, पण एपूण 15 पदके जिंकली.मात्र याच नेमबाजीने तीन नवी सुवर्ण देत आशेचा दिवा विझू दिलेला नाही!

Comments are closed.