वर्ल्ड कपमध्ये उडवला नेदरलँड्सचा धुव्वा; स्मृती मानधनाची वादळी खेळी, हिंदुस्थानचा सलग दुसरा विजय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

स्मृती मानधनाच्या तुफानी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सचा धुव्वा उडवला. स्मृतीच्या खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने 209 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर नेदरलँड्सला 114 धावांवर ऑल आऊट करत 95 धावांनी सामना सहजपणे खिशात टाकला. हिंदुस्थानचा हा सलग दुसरा विजय ठरला. हिंदुस्थानने पाकिस्तानला वर्ल्ड कपच्या सलामीच्या लढतीत पराभूत केले होते.

नेदरलँड्सने टॉस जिंकला खरा, पण त्यानंतर हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीला पाचारण करत त्यांनी मोठी चूक केली. या गोष्टीचा फायदा स्मृती आणि तिची सहकारी शेफाली वर्मा यांनी उचलला. या दोघींनी मिळून 112 धावांची दमदार सलामी दिली. शेफाली 55 धावांवर बाद झाली आणि ही जोडी फुटली. पण त्यानंतरही स्मृतीने धडाकेबाज फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. स्मृतीने यावेळी 47 चेंडूंत 11 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 74 धावांची खेळी साकारली.

हिंदुस्थानच्या 210 धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सला सुरुवातीपासून धक्के बसत गेले आणि त्यामुळे ते सामन्यात कुठेच नव्हते. हिंदुस्थानकडून श्री चरणीने सर्वाधिक चार विकेट्स मिळवल्या, तर शेफालीने तीव विकेट्स देत तिला सुयोग्य साथ दिली.

Comments are closed.