महिला T20 WC 2026 – भारताची आव्हाने कायम आहेत; शेफाली वर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशचा सहज पराभव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानने महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. हिंदुस्थानला गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण या विजयासह हिंदुस्थानने आपले स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. हिंदुस्थानने बांगलादेशला 136 धावांवर रोखले. हिंदुस्थानने शेफाली वर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान पाच विकेट्स आणि 19 चेंडू राखत विजय साकारला.

रेणुका सिंगने पहिल्याच षटकात बांगलादेशला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर बांगलादेशच्या जुआरिया फिर्दोसने 32 धावा करत संघाला सावरले. त्यानंतर कर्णधार निगर सुलतानानेही 32 धावांची खेळी साकारली आणि संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. अखेरच्या षटकांमध्ये हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी अंकुश ठेवल्यामुळे बांगलादेशला 136 धावांवर समाधान मानावे लागले.

बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधना ही 8 धावांवर बाद झाली. पण त्यानंतर शेफालीने 3 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 53 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यानंतर हिंदुस्थानचे चार सामन्यांत तीन विजय झाले आहेत.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश – 20 षटकांत 8 बाद 136 (निगर सुलताना 32; राधा यादव 3/28) पराभूत वि.

हिंदुस्थान – १६.५ षटकांत ५ बाद १३९ (शेफाली वर्मा ५३; रितू मोनी २/२९).

Comments are closed.