सिया गोयलच्या बचावासाठी सुप्रीम कोर्टातील नामांकित वकील उतरले मैदानात, केतन अग्रवाल प्रकरणात मो

केतन अग्रवाल पुणे लोहगड मृत्यू प्रकरण: पुण्यातील (Pune) बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणात आता महत्त्वाची कायदेशीर घडामोड झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) हिच्या बचावासाठी सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) वरिष्ठ वकील अॅड. आशुतोष श्रीवास्तव (Ashutosh Srivastava) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांनी अधिकृतपणे सिया गोयलची बाजू मांडण्याची जबाबदारी स्वीकारली.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, “हे प्रकरण अद्याप तपासाधीन आहे. माझी पक्षकार सिया गोयल तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहे आणि पुढेही करत राहील. भारतीय संविधान प्रत्येक आरोपीला न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार देते. त्यामुळे कायद्याने मिळालेल्या अधिकारांनुसार आम्ही आमची बाजू मांडू,” असे त्यांनी सांगितले. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यापेक्षा अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: नेमकं काय आहे प्रकरण?

26 वर्षीय केतन अग्रवाल याचा 18 जून रोजी लोहगड किल्ल्याजवळील खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची सुरुवातीला नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून नियोजनबद्ध हत्या असल्याचा दावा करण्यात आला. तपासानुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतनला ट्रेकिंगच्या बहाण्याने लोहगडावर नेले. त्यानंतर दोघांनी मिळून त्याला दरीत ढकलल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: दोन्ही आरोपी एकमेकांवरच ढकलत आहेत जबाबदारी

दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी आता एकमेकांवरच हत्येच्या कटाचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. चेतन चौधरीने पोलिसांना दिलेल्या जबाबात, “मी सियासोबत पळून जाण्याचा विचार करत होतो. मात्र, केतनची हत्या करण्याचा आग्रह सियानेच धरला,” असा दावा केला आहे. दुसरीकडे, सिया गोयलने “केतनच्या हत्येची कल्पना चेतनची होती,” असा प्रतिदावा केला आहे. पोलिसांच्या मते, एकमेकांवर दोषारोप करणे ही आरोपींची बचावाची रणनीती असू शकते.

Ketan Agrawal: कोण आहे केतन अग्रवाल?

– केतन अग्रवाल हा पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे.
– 25 वर्षीय केतनने सिम्बॉयसिसमधून बीबीएचे शिक्षण घेतले असून, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता.
– दोन वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण करून तो भारतात परतला आणि वडिलांच्या बांधकाम व्यवसायात सहभागी झाला.
– गेल्या वर्षी त्याने स्वतःचे बांधकाम प्रकल्प विकसित करण्यास सुरुवात केली.
– फेब्रुवारी महिन्यात त्याचा सिया गोयलसोबत साखरपुडा झाला होता.
– मात्र, नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकण्यापूर्वीच सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी केतनची हत्या केल्याचा आरोप आहे.

Siya Goyal: कोण आहे सिया गोयल?

– सिया गोयल ही पुण्यातील व्यावसायिक प्रवीण गोयल यांची कन्या आहे.
– 20 वर्षीय सिया बी.कॉमचे शिक्षण घेत आहे.
– गोयल कुटुंबीयांचा ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांचा व्यवसाय आहे.
– सियासाठी मार्केटयार्ड परिसरात केक विक्रीसाठी स्वतंत्र बेकरी सुरू करून देण्यात आली होती.

Chetan Choudhari: कोण आहे चेतन चौधरी?

– 23 वर्षीय चेतन चौधरीने बीबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.
– गेल्या दोन वर्षांपासून तो मार्केटयार्ड परिसरातील वडिलांचा ड्रायफ्रूट्स आणि किराणा व्यापाराचा व्यवसाय सांभाळत आहे.
– चेतन एक उत्कृष्ट क्रिकेटपटू असून रणजी क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न होते.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Siya Goyal Lohagad Fort: सियाच्या कृत्याच्या धक्क्याने वडील ICUमध्ये, आई म्हणाली, ‘माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या’

Comments are closed.