गोळीबार थांबवा, अन्यथा 250 टक्के आयात शुल्क लावेल; हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षाबाबत ट्रम्प यांचा नवा दावा, नोबेल न मिळाल्याची खंत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक दावा केला आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यासाठी आपण मध्यस्थी केल्याचे ट्रम्प म्हणाले. गोळीबार थांबवला नाही तर 250 टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी दिली. या दबावामुळे दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांनी गोळीबार थांबवला आणि युद्ध थांबले, असे ट्रम्प म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू झाला होता. मात्र आपण मध्यस्थी केल्याने हा संघर्ष थांबला, असा दावा ट्रम्प यांनी पुन्हा केला. तुम्ही जर भांडत राहिलात, तर तुम्हाला अमेरिकेसोबत व्यापार करता येणार नाही. मी तुमच्यावर 250 टक्के आयात शुल्क लावे. यामुळे तुम्हाला व्यापार करणेही शक्य होणार नाही, असे आपण दोन्ही देशांना स्पष्ट सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले. या इशाऱ्यानंतर दोन्ही देश सुरुवातीला संतापले होते, मात्र अखेरीस त्यांनी गोळीबार थांबवला आणि युद्ध संपले, असा दावा ट्रम्प यांनी केला.
#पाहा | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, “…तुम्ही भारत आणि पाकिस्तान या दोन आण्विक राष्ट्रांना थांबवा… मी म्हणालो, “मित्रांनो, तुम्ही असे करणार असाल तर तुम्ही अमेरिकेशी व्यापार करणार नाही… मी तुमच्या दोघांवर 250 टक्के प्रचंड शुल्क लावणार आहे, त्यामुळे तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकणार नाही.” ते खूप अस्वस्थ झाले, खूप रागावले; त्यांनी शूटिंग थांबवले आणि युद्ध संपले…अकरा विमाने शूट झाली. मी ही सर्व युद्धे थांबवली आणि असे करणे खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे…”
(व्हिडिओ स्त्रोत: रॉयटर्स)
— ANI (@ANI) 23 ऑक्टोबर 2026
Comments are closed.