पहिल्या वनडेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली! वैभव सूर्यवंशीचा चौकार-षटकारांचा पाऊस, पण ख

ऑस्ट्रेलिया यू 19 वि इंडिया यू 19: ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय अंडर-19 संघाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ केवळ 225 धावांवर गारद झाला. हे लक्ष्य भारतीय संघाने 7 गडी राखून सहज गाठले. वैभव सूर्यवंशीने दमदार सुरुवात करून दिली, त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज अभिग्यान कुंडू आणि वेदांत त्रिवेदी यांनी नाबाद खेळी करून भारताला मोठा विजय मिळवून दिला. अभिग्यान कुंडूला सामनावीर (प्लेयर ऑफ द मॅच) म्हणून घोषित करण्यात आले.

वैभव सूर्यावंशी तुफानी सूरुवाट (ऑस्ट्रेलियामध्ये वैभव सूर्यावंशी आग)

भारतीय संघास विजयासाठी 226 धावांचे लक्ष्य मिळाले होते. तेव्हा वैभव सूर्यवंशीने तूफानी फलंदाजी करत फक्त 22 चेंडूत 38 धावा ठोकल्या, ज्यात 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. मात्र, कर्णधार आयुष म्हात्रे (6) आणि विहान मल्होत्रा (9) स्वस्तात बाद झाले. भारताची 3 गडी 75 धावांवर तंबूत होते, तेव्हा वेदांत त्रिवेदी आणि अभिग्यान कुंडू यांनी जबाबदारी घेतली आणि 31 व्या षटकात टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

अभिग्यान कुंडू थर्ला खारा हिरो! (अभिग्यान कुंडू ऑस्ट्रेलिया यू 19 वि इंडिया यू 19)

वेदांत त्रिवेदीने 69 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या, त्यात 8 चौकारांचा समावेश होता. तर अभिग्यान कुंडूने 74 चेंडूत तुफानी नाबाद 87 धावा ठोकल्या, ज्यात 8 चौकार आणि तब्बल 5 षटकार होते. त्याच्या या खेळीमुळेच भारताने सहज विजय मिळवला आणि त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यापूर्वी भारतीय गोलंदाजांनीही अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाला 225 धावांवर रोखले. हेनिल पटेलने 10 षटकांत 38 धावांत 3 बळी घेतले. किशन कुमार आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर आर. एस. अम्ब्रीशने 1 विकेट मिळवली.

कोण आहे अभिग्यान कुंडू? (Who is Abhigyan Kundu?)

2008 मध्ये जन्मलेला डावखुरा फलंदाज अभिग्यान कुंडूने अगदी लहान वयातच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिग्यानचे वडील क्रिकेटचे प्रचंड चाहते असल्याने त्यांनी मुलाला क्रिकेटपटू बनवण्याचे स्वप्न पाहिले. फक्त आठव्या वर्षीच या यष्टीरक्षक-फलंदाजाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि काही काळातच मुंबईच्या अंडर-14 संघात स्थान मिळवले. त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षकांच्या म्हणण्यानुसार, अभिग्यानने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत तब्बल 50 लाख चेंडूंना सामोरे गेला आहे. यामध्ये 24,500 धावा केल्या आणि तब्बल 122 शतके झळकावली आहेत.

शालेय क्रिकेटमध्ये एकाच हंगामात 1000 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. त्यानंतर अंडर-16 नॅशनल्समध्ये आपल्या राज्य संघाला विजय मिळवून दिला. पुढे त्याची निवड मुंबईच्या अंडर-19 संघात झाली आणि त्याला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. फक्त 15 व्या वर्षी त्याने पहिलं शतक ठोकलं. मुंबईकडून खेळताना त्याने 175 धावांची झळाळती खेळी खेळली असून तीच त्याची सर्वोच्च खेळी आहे.

हे ही वाचा –

IND Squad vs WI Test Series : ऋषभ पंत बाहेर, KL राहुल उपकर्णधार; श्रेयस अय्यरची एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी ‘या’ 15 शिलेदारांनी मिळणार संधी?

आणखी वाचा

Comments are closed.