IND vs ENG: कधी आणि किती वाजता खेळला जाणार तिसरा वनडे? हिटमॅन शर्माच्या निर्णयाकडे चाहत्यांचं लक्ष

टीम इंडिया आणि इंग्लंड (Team india vs ENG) यांच्यातील वनडे मालिका सध्या अत्यंत चुरशीच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. पहिला वनडे सामना टीम इंडियाने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता जो संघ शेवटचा सामना जिंकेल, तोच मालिका आपल्या नावावर करेल.

दरम्यान, टी20 मालिका इंग्लंडने जिंकल्यामुळे टीम इंडियाला आधीच पराभवाचा सामना करावा लागला आहे, आता वनडे मालिकेतही तसे घडू नये अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे, टी20 मालिकेत टीम इंडियाचा ‘क्लीन स्वीप’ झाला होता, पण वनडे मालिकेत किमान एक सामना जिंकल्यामुळे तसे होणार नाही.

या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा सामना 19 जुलै, रविवारी खेळवला जाईल. या सामन्यासोबतच टीम इंडियाच्या या दौऱ्याची सांगता होईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचा टॉस 3:00 वाजता होईल.

मालिकेतील पहिला सामना याच वेळी सुरू झाला होता, मात्र दुसरा सामना 5:30 वाजता खेळला गेला होता. तिसरा सामना दुपारी 3:30 ला सुरू होऊन रात्री 10:30 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

मालिकेतील हा शेवटचा सामना असल्याने सर्वांच्या नजरा रोहित शर्मा (Rohit Sharma and virat kohli) आणि विराट कोहलीवर असतील. रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत किंवा त्याला संघातून वगळण्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत, मात्र यात किती तथ्य आहे हे आगामी काळात स्पष्ट होईल.

या सामन्यात रोहित आणि कोहली एकत्रितपणे आपला 400 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहेत, ही एक मोठी कामगिरी आहे. आता या निर्णायक सामन्यात हे दोन्ही फलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments are closed.