क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू खेळाडूचं 89 व्या वर्षी निधन! क्रीडाजगतावर शोककळा

वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स (Gary Sobers passes away at age of 89) यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. अवघ्या दोन आठवड्यांवर त्यांचा 90 वा वाढदिवस होता. तसेच, त्यांना क्रिकेट इतिहासातील सर्वात महान अष्टपैलू (all-rounder) खेळाडूंपैकी एक मानले जात होते.

त्यांनी 1954 ते 1973 या काळात वेस्ट इंडीजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. वनडे क्रिकेट सुरू होण्यापूर्वीच्या काळात, कसोटी क्रिकेटवर सर गारफील्ड सोबर्स यांचे वर्चस्व होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ एक वनडे सामना खेळला, मात्र कसोटी क्रिकेटमध्ये 8 हजारांहून अधिक धावा आणि 235 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

त्यांचा जन्म 28 जुलै 1936 रोजी कॅरिबियन बेटांवरील बार्बाडोस येथे झाला होता. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते तीन वेगवेगळ्या शैलीत गोलंदाजी करू शकत होते. ते डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी (Fast bowling), ऑफ-स्पिन आणि लेग-स्पिन अशा तिन्ही प्रकारांत गोलंदाजी करत असत.

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाद्वारे त्यांच्या निधनाची बातमी जाहीर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सर गारफील्ड सोबर्स यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

1954 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात त्यांनी दोन्ही डावांत फलंदाजी करताना एकूण 40 धावा केल्या आणि पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या 93 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत त्यांनी 8,032 धावा आणि 235 विकेट्स घेतल्या तर आपल्या एकमेव वनडे सामन्यात त्यांनी 1 विकेट घेतली होती.

Comments are closed.