लंकादहन करत हिंदुस्थान अंतिम फेरीत; सुवर्णपदकासाठी पाकिस्तानशी होणार महामुकाबला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत लंकादहन करत थेट फायनल गाठली आहे. आता हिंदुस्थानचा सुवर्णपदकासाठी पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला होणार आहे. ही टी-20 क्रिकेटची फायनल 3 ऑक्टोबरला खेळवली जाणार आहे. हिंदुस्थानने श्रीलंकेवर 124 धावांनी दणदणीत विजय साकारत उपांत्य फेरीत मोठा विजय साकारला. हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना 169 धावा उभारल्या होत्या. त्यानंतर हिंदुस्थानने श्रीलंकेचा 45 धावांत खुर्दा उडवत दणकेबाज विजय साकारला.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत हिंदुस्थानला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांना एकामागून एक धक्के द्यायला सुरुवात केली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे दोघेही प्रत्येकी 7 धावांवर बाद झाले, तर कर्णधार श्रेयस अय्यरला 13 धावांवर समाधान मानावे लागले. पण दुसरीकडे वैभव सूर्यवंशीने 21 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 38 धावा फटकावल्या. वैभव बाद झाल्यावर हिंदुस्थानचा संघ अडचणी सापडेल असे वाटत होते, पण ईशान किशन यावेळी संकटमोचक ठरला. ईशानने 46 चेंडूंत 4 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 80 धावांची तुफानी खेळी साकारली आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

हिंदुस्थानच्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया श्रीलंकेला जसप्रीत बुमराने पहिल्याच षटकात दोन धक्के देत त्यांचे पंबरडे मोडले. त्यानंतर श्रीलंकेचा संघ सावरूच शकला नाही. श्रीलंकेच्या एकाच फलंदाजाला फक्त दोन अंकी धावसंख्या उभारता आली, तर सहा फलंदाज भोपळाही पह्डू शकले नाही. यावरून श्रीलंकेची किती दयनीय अवस्था झाली असेल, हे समजता येऊ शकते. हिंदुस्थानकडून बुमरा, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.

Comments are closed.