अमनजोतची अफलातून फील्डिंग, दीप्ति अन् शेफालीची दमदार कामगिरी! भारताच्या तीन लेकींनी मॅच फिरवली
भारताने महिला विश्वचषक 2025 जिंकला: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 च्या फायनलमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर (भारताने दक्षिण आफ्रिकेचा महिला विश्वचषक २०२५ च्या फायनलमध्ये पराभव केला) विजय मिळवला आहे. भारतानं नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या या विजयात तीन खेळाडूंची कामगिरी महत्त्वाची ठरली. शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा आणि अमनजोत कौरची फील्डिंग महत्वाची ठरली.
𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒 🏆
चे अभिनंदन #TeamIndia त्यांचा पहिला ICC महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल 🇮🇳
घ्या. A. धनुष्य 🙌#WomenInBlue | #CWC25 | #फायनल | #INDvSA pic.twitter.com/rYIFjasxmc
— BCCI महिला (@BCCIWomen) 2 नोव्हेंबर 2025
भारताच्या तीन लेकींनी मॅच फिरवली अन् टीम इंडिया ‘चॅम्पियन’
अमनजोत कौरनं आधी ताजमिन ब्रिटसला रनआऊट केलं. त्यानंतर त्याने महत्वाचा म्हणजे दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्टचा कॅच घेतला. तर शेफाली वर्मानं 87 धावा केल्या आणि 2 विकेट घेतल्या. दीप्ति शर्मानं 58 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या 5 विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
8️⃣7️⃣ बॅटने धावा 💪
2️⃣/3️⃣6️⃣ चेंडूसह ☝मधील तिच्या प्रभावी कामगिरीबद्दल #फायनलशफाली वर्माने सामनावीराचा पुरस्कार जिंकला 🏅
स्कोअरकार्ड ▶ https://t.co/TIbbeE4ViO#TeamIndia | #WomenInBlue | #CWC25 | #INDvSA | @TheShafaliVerma pic.twitter.com/r7gxRyuoHt
— BCCI महिला (@BCCIWomen) 2 नोव्हेंबर 2025
भारतीय महिला संघाने अखेर इतिहास रचला
वुमेन्स वनडे वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद आपल्या नावावर केलं. भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 7 गडी गमावून 298 धावा केल्या. प्रत्युत्तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांवर गारद झाला. या विजयात दीप्ती शर्माने निर्णायक भूमिका बजावली, तिने अवघ्या पाच बळी घेतल्या. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्टने शतकी (101) खेळी केली, पण तिची मेहनत वाया गेली. 52 वर्षांच्या महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच हा किताब जिंकला आहे. पहिला महिला वनडे वर्ल्ड कप 1973 साली खेळवला गेला होता. दीप्तीशिवाय शेफाली वर्मानेही कमाल दाखवली, तिने फलंदाजीत 87 धावा झळकावल्या आणि गोलंदाजीत दोन गडी बाद केले. तिच्या सर्वांगीण कामगिरीसाठी तिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.
षटकात दोन! 👏
दीप्ती शर्माचा दुहेरी फटका आहे #TeamIndia विजयापासून 2⃣ विकेट्स दूर 👌
अपडेट्स ▶ https://t.co/TIbbeE4ViO#WomenInBlue | #CWC25 | #फायनल | #INDvSA | @दीप्ती_शर्मा०६ pic.twitter.com/lNqwjDxgov
— BCCI महिला (@BCCIWomen) 2 नोव्हेंबर 2025
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.