सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
नवी दिल्ली : भारतीय उद्योग व्यापार मंडळानं सध्याचा सणांचा हंगाम आणि आगामी लग्नसराईचा हंगाम या कालावधीत देशात 7 लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबूलाल गुप्ता यांनी म्हटलं की सणांच्या हंगामाच्या सुरुवातीला देशातील बाजारात जोरदार तेजी आली आहे. विविध क्षेत्रात मिळून 7.58 लाख कोटी रुपयांच्या उलाढालीची अपेक्षा आहे. हा अंदाज देशभरात मंडळाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे.
Indian Economy Will Stronger सणांच्या हंगामानं अर्थव्यवस्थेला ऊर्जा
बाबुलाल गुप्ता म्हणाले की ग्राहकांची वाढती खरेदी क्षमता, स्थानिक उत्पदनांच्या प्रती वाढलेला उत्साह आणि जीएसटी व्यवस्थेतील सुधारणा यामुळं रिटेल आणि ठोक व्यापाराला नवी ताकद मिळाली आहे. ते म्हणाले, वाहन, रिअल इस्टेट, किराणा, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, पारंपरिक सजावट, पोशाख आणि ड्रायफ्रूटस क्षेत्रातील विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. छोट्या आणि मध्यम शहरातील देशांतर्गत उत्पादनांची मागणी वाढलीय. मातीचे दिवे,मूर्ती या सारख्या पारंपरिक हातानं निर्माण केलेल्या वस्तूंची मागणी सणांमुळं वाढली आहे. ग्रामीण बाजारात पीक कापणीनंतर उत्पादन वाढल्यानं आणि लग्नसराईच्या निमित्तानं विक्री वाढत आहे. गुप्ता म्हणाले की फटाके विक्री देखील समग्र व्यापारात योगदान देते. उत्तर प्रदेशात 10 हजार कोटींहून अधिक वस्तूंच्या विक्रीचा अंदाज आहे.
रिअल इस्टेटमध्ये तेजी
बाबुलाल गुप्ता म्हणाले की ऑटोमोबाईल क्षेत्र ज्यात कार, दुचाकी वाहने आणि ई -रिक्शा यांचा समावेश आहे. या क्षेत्रात जवळपास 1.30 लाख कोटी रुपयांच्या अंदाजित विक्री होऊ शकते. यानंतर रिअल इस्टेटचा व्यवसाय 1.20 लाख कोटींपर्यंत राहू शकतो. जीवनावश्यक वस्तूंचा कारभार 1 लाख कोटी रुपयांपर्यंत असेल. गुप्ता म्हणाले मुंबई, चेन्नई ते उत्तर भारतातील छोट्या शहरांपर्यंतच्या कानात दिवाळीचा सण आणि त्या काळात सणांच्या वस्तूंची वाढलेली मागणी उल्लेखनीय असून दिसत आहे. सणांच्या हंगामाची सुरुवात नवरात्रीपासून सुरु झाली होती. दिवाळीनंतर लग्न सराईला वेग मिळाल्यानं अर्थव्यवस्था वाढण्याचा अंदाज आहे. प्रमुख व्यापारी केंद्रातून ही आकडेवारी घेण्यात आली.
मंडळाच्या विशेष समितीनं दिल्ली, मुंबईचेन्नई, अहमदाबाद, बंगळुरु, हैदराबाद, जयपूर, चंदीगढ, कानपूर, पाटणा, इंदौर, रायपूर, रांची, हरिद्वार, त्रिपुरा आणि कटक सारख्या प्रमुख व्यापारी केंद्रातून माहिती गेळा करण्या आली. याचा वापर स्थानिक विक्री वाढल्यानं ट्रेंड समजावून घेण्याच्या बाबत सहकार्य मिळालं.
आणखी वाचा
Comments are closed.