क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्याचे फोटो शेअर करू नका, सौदी अरेबियात हिंदुस्थानींसाठी दूतावासाची सूचना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

येमेनमधील हुती बंडखोरांशी संबंधित हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियातील हिंदुस्थानी नागरिकांसाठी हिंदुस्थानी दूतावासाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कारवाईचे तसेच त्यांच्यामुळे झालेल्या नुकसानीचे व्हिडीओ चित्रीकरण करणे किंवा त्यासंबंधीची माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे, असे आवाहन दूतावासाने केले आहे.

हिंदुस्थानी दूतावासाने रविवारी सोशल मीडियावर ही सूचना प्रसिद्ध केली. यासाठी सौदी अरेबियाच्या नागरी संरक्षण संचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेचाही संदर्भ देण्यात आला आहे. क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखण्याच्या कारवाईची माहिती किंवा घटनास्थळांचे व्हिडीओ प्रसिद्ध केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा सौदी प्रशासनाने दिला आहे.

विमानसेवा स्थगित

विमानसेवेतील व्यत्ययाबाबतही हिंदुस्थानी दूतावासाने माहिती दिली आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्प्रेसची रियाध आणि दमाम येथून येणारी तसेच तेथे जाणारी विमानसेवा 7 नोव्हेंबरपर्यंत स्थगित राहणार आहे. तर जेद्दाह येथून येणारी आणि तेथे जाणारी उड्डाणे 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे.

Comments are closed.