भारतीय ग्रँडमास्टर इनियान पा विजेता ठरला.
वृत्तसंस्था, पॅरिस
भारताचा ग्रँडमास्टर इनियान पा याने नुकत्याच येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या सहाव्या ला प्लेगेनी खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दर्जेदार कामगिरीसह विजेतेपद पटकाविले. चालु वर्षातील बुद्धिबळ हंगामात इनियानचे हे चौथे विजेतेपद आहे.
फ्रान्समधीला या स्पर्धेत ग्रँडमास्टर पाने शेवटपर्यंत अपराजित राहून विजेतेपद पटकाविले आहे. त्याने या स्पर्धेत मास्टर विभागात आपला सहभाग दर्शविला होता. सदर स्पर्धेत 20 देशांचे 142 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये 13 ग्रँडमास्टर, 22 इंटरनॅशनल मास्टरांचा समावेश आहे. इनियान पा ने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविताना 9 फेऱ्यांअखेर 7.5 गुणांची नोंद केली. 23 वर्षीय इनियानने पाचव्या फेरीतील डाव बरोबरीत राखला होता तर त्याने सलग तीन सामने जिंकून विजेतेपदावर शिक्कमोर्तब केला. इनियानने या स्पर्धेत इटलीचा ग्रँडमास्टर लुका मोरोनी, युक्रेनचा इंटरनॅशनल मास्टर मोसेसोव्ह यांचा पराभव केला. युक्रेनचा मोसेसोव्ह या स्पर्धेत उपविजेता ठरला असून मोरोनी तिसऱ्या स्थानावर राहिला.
Comments are closed.