देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित
कोल्हापूर: छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मी कसा बदलू शकतो. त्यांचा खोटा आणि घाणेरडा इतिहास मी सांगावा, अशी काहीजणांची इच्छा आहे. पण मी खरा इतिहास सांगण्यापासून कधी मागे हटणार नाही. उलट दहा पावले पुढे जाऊन इतिहास सांगेन, असा निर्धार इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत (Indrajeet Sawant) यांनी व्यक्त केला. इंद्रजित सावंत यांना फोनवरुन एका व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर इंद्रजित सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.
मला साधारण रात्री 12 वाजता धमकीचा फोन आला. फोनवरील व्यक्ती शिव्या घालून जातीवाचक बोलत होती. हा महाराष्ट्र पेशव्यांचा होत आहे का? अशी खंत वाटते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मी एका विशिष्ट समाजाचा आहे असा कधी उल्लेख केला नाही. फोनवरील व्यक्तीने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. राज्याच्या गृहमंत्रालयाकडून यावर कारवाई करण्यात यावी. मला धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा व्यक्तीवर कारवाई करतील. संबधित व्यक्तीची मोठ्या नेत्यांबरोबर उठबस आहे. त्यांनी यावर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत हा संदेश द्यावा, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले.
अशा पद्धतीच्या धमकीला भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्यास मी समर्थ आहे, माझे नातेवाईक, सहकारी सक्षम आहेत फोनवरील व्यक्तीने मला घरात घुसून मारण्याची धमकी दिली. मात्र, मराठ्यांचा इतिहास काय आहे ते त्यांना माहिती आहे. मी खरा इतिहास सांगण्यापासून कधी मागे हटणार नाही, उलट दहा पावले पुढे जाऊन इतिहास सांगेन, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले.
मी इंद्रजित सावंतांना फोन केला नाही, प्रशांत कोरटकरांचं स्पष्टीकरण
इंद्रजीत सावंत यांना मी ओळखत नाही, त्यांना कधीच फोनवर संपर्क ही साधलेला नाही, त्यामुळे इंद्रजीत सावंत यांना देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण प्रशांत कोरटकर यांनी दिला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जी कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांनी पोस्ट केली आहे. त्या कॉल रेकॉर्डिंगमधील आवाजही माझा नाही, असा दावाही प्रशांत कोरटकर यांनी केला आहे.
इंद्रजीत सावंत यांनी फेसबुक पोस्ट करून माझा नाव वापरण्यापूर्वी किमान माझ्याशी संपर्क साधायला हवा होता. किंबहुना त्यांना आलेला कॉल मीच केला आहे की नाही याची शहानिशा करायला हवी होती. त्यांनी असं काहीही न करता फेसबुक पोस्ट करून माझी बदनामी तर केलीच आहे. सोबतच मला सकाळपासून अनेक धमकीचे कॉल येत आहेत. त्यामुळे मी इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात पोलिसांकडे आणि सायबर सेलमध्ये तक्रार करेल असंही कोरटकर म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्य आहेत, त्यांच्याबद्दल चुकीचे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी इतिहासाचा विद्यार्थी असलो तरी इतिहास विषयाचा तज्ञ नसल्यामुळे इंद्रजीत सावंत सारख्या इतिहास तज्ञाला फोन करून वाद घालण्याचा प्रश्नही उद्भवत नसल्याचे कोरटकर म्हणाले. ‘एबीपी माझा’ने प्रशांत कोरडकर यांना इंग्रजीत सावंत यांची फेसबुक पोस्ट दाखवत त्यातील कॉल रेकॉर्डिंग ऐकवली ती ऐकल्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी हा आवाज माझा नाही असा दावा पुन्हा एकदा केला.
https://www.youtube.com/watch?v=6eo41d9ydns
आणखी वाचा
इंद्रजित सावंतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना फोन लावला अन्…
अधिक पाहा..
Comments are closed.