SCO शिखर परिषदेत 'इंद्रप्रस्थ' घोषणा
प्रत्येक संस्कृतीचा एकसमान आदर; सांस्कृतिक वारसा जतन करण्यावर भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने आयोजित केलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संस्कृती संवाद मंचावर रविवारी ‘इंद्रप्रस्थ’ घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले. हा दस्तऐवज जगातील प्रत्येक संस्कृतीला समान आदर आणि आपले विचार व्यक्त करण्याच्या समान हक्कांवर भर देतो. तसेच, सांस्कृतिक वारसा जतन करण्याची आणि त्याची अवैध तस्करी रोखण्याची गरज यावरही त्यात प्रकाश टाकण्यात आला आहे. दिल्लीतील ऐतिहासिक पुराना किल्ला येथे आयोजित या तीन दिवसीय मंचावर एससीओ सदस्य देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
इंद्रप्रस्थ घोषणापत्रामध्ये प्रामुख्याने संस्कृतींमधील समानता आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण यासंबंधीच्या मुद्यांवर भाष्य करण्यात आले. हा दस्तऐवज मंचावरील सदस्य देशांमधील चर्चा आणि त्यांच्या सूचनांच्या आधारे तयार करण्यात आला आहे. या दस्तऐवजात विविध संस्कृतींचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यात एससीओ सदस्य देशांमधील चर्चा आणि अन्य सूचनांचाही समावेश आहे.
एससीओचा तीन दिवसीय ‘सभ्यता संवाद’ दिल्लीतील ऐतिहासिक ‘पुराना किल्ला’ येथे आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. विविध एससीओ सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांनीही या मंचावर सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या समारोपात अंतिम दस्तऐवज म्हणून ‘इंद्रप्रस्थ घोषणापत्रा’चे अनावरण करण्यात आले.
भारत-पाकिस्तानमध्ये अनौपचारिक चर्चा
या कार्यक्रमात पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांच्या उपस्थितीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संभाव्य चर्चेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला. दोन्ही देशांमध्ये कोणतीही औपचारिक द्विपक्षीय चर्चा झाली नसल्याचे केंद्रीय सांस्कृतिक सचिव विवेक अग्रवाल यांनी सांगितले. तथापि, त्यांनी भारतीय बाजूच्या सदस्यांनी डिनरदरम्यान पाकिस्तानी मंत्र्यांशी संवाद साधला होता. याशिवाय, या मंचावर दोन्ही बाजूंमध्ये काही अनौपचारिक चर्चाही झाली. अशाप्रकारे कार्यक्रमादरम्यान संपर्क झाला, पण त्याला औपचारिक द्विपक्षीय चर्चा म्हटले गेले नाही.
इराणची सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी
अमेरिकेसोबतच्या दीर्घकालीन तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आता सांस्कृतिक मुत्सद्देगिरीद्वारे आपली जागतिक ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात आयोजित पहिल्या एससीओ सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरममध्ये, इराणने सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर करून लक्ष वेधून घेतले. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) सदस्य राष्ट्रांनी आपला सामायिक वारसा जतन करावा आणि विज्ञान, शिक्षण व संस्कृती या क्षेत्रांमध्ये एकत्र काम करावे, अशी इराणची इच्छा आहे. या उद्देशाने, इराणने हस्तलिखिते जतन करणे, पुस्तकांचे भाषांतर करणे आणि युवा संवादाला प्रोत्साहन देणे यांसारख्या उपक्रमांची सूचना केली आहे.
Comments are closed.