दुहेरी हत्याकांड : 'संजय गांधी' अटक

चेन्नई: तामिळनाडूच्या तिरुपत्तूर जिल्ह्यात प्रेमसंबंधातील संशयातून महिला आणि तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मालिनी (31 वर्षे) आणि रंजीत कुमार (30 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी संजय गांधी (29 वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

मालिनी आणि आरोपीची ओळख शाळेच्या रियुनियनमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, मालिनीचे रंजीत कुमार याच्याशी जवळचे संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. मालिनी आणि रंजीत एका भूखंडाची पाहणी करण्यासाठी कारमधून आले होते. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ल ा केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइलच्या आधारे तपास केला. विशेष पथकाने आरोपीला अटक केली. दरम्यान या दुहेरी हत्याप्रकरणावरून तामिळनाडूतील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला असून विरोधी पक्षांनी  राज्य सरकारवर टीका केली आहे.

Comments are closed.