तेलंगणा काँग्रेसमधील मतभेद तीव्र झाले आहेत
राजगोपाल रेड्डी घेणार नव्या प्रभारींची भेट
वृत्तसंस्था, हैदराबाद
तेलंगणा काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. मुनुगोडेचे आमदार कोमटिरेड्डी राजगोपाल रेड्डी हे सोमवारी पक्षाचे नवे प्रदेश प्रभारी बी.एम. संदीप यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत मतदारसंघातील विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार ते मांडण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव सचिन सावंत यांनी राजगोपाल रे•ाr यांच्याशी फोनवरून चर्चा करून बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
नव्या प्रभारींसमोर आव्हान
बी.एम. संदीप यांनी मीनाक्षी नटराजन यांची जागा घेतली असून रविवारी ते पहिल्यांदाच हैदराबामध्ये दाखल झाले. गांधी भवन येथे होणाऱ्या पक्षाच्या बैठकींमध्ये मुख्यमंत्री रेवंत रे•ाr, उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्का आणि प्रदेशाध्यक्ष बी. महेश कुमार गौड यांच्यासह वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत.
रेवंत रेड्डी च्या कार्यपद्धतीवर टीका
राजगोपाल रेड्डी यांनी अलिकडेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. निधी वाटपात कोडंगल आणि मधिरा या मतदारसंघांना प्राधान्य दिले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. मुनुगोडेसारख्या मागास भागांनाही समान निधी मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. निधीअभावी रस्ते, सिंचन आणि चौटुप्पल येथील प्रस्तावित 100 बेड्सच्या रुग्णालयाचे काम रखडल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, काँग्रेस पक्ष सोडण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट पेले आहे.
पक्षातील नाराजी वाढली
तेलंगणा काँग्रेसमध्ये यापूर्वीही नेत्यांमध्ये मतभेद झाले आहेत. आरोग्यमंत्री सी. दामोदर राजनरसिंह आणि आमदार टी. लक्ष्मीकांत राव यांच्यात पक्ष संघटनेतील नियुक्त्यांवरून वाद झाले होते. खासदार जी. वामशी कृष्णा आणि मंत्री डी. श्रीधर बाबू यांच्यातही मतभेद समोर आले होते. दरम्यान आमदारांच्या तक्रारी, निधी वाटप, संघटनात्मक नियुक्त्या आणि सरकार-पक्षातील समन्वय हे प्रश्न नव्या प्रभारींसमोर असतील. या पार्श्वभूमीवर संदीप यांच्यावर पक्षातील मतभेद दूर करून एकजूट राखण्याची जबाबदारी असेल.
Comments are closed.