अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीसाठी पहिले केले दुर्लक्षित! आता डीसीचा स्टार पुन्हा भारतीय संघात सामील मात्र 'या' भुमिकेत

आयपीएल २०२६ स्पर्धा संपली आता खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत घरच्या मैदानावर अफगाणिस्तान विरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना ६ ते १० जून दरम्यान मुल्लणपूरमध्ये खेळला जाणार आहे. यासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून काहींचा स्वप्नभंग झाला आहे. त्यामध्ये जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबी याचाही समावेश आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहिल्या-वहिल्या रणजी ट्रॉफी विजेतेपदामध्ये नबीने प्रमुख भुमिका पार पाडली होती. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक ६० विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला आता भारताच्या कसोटी संघात स्थान मिळणार अशी चर्चा सुरू झाली मात्र त्याची निवड झाली नाही आणि त्यानंतर सर्वत्र निवड समीतीवर टीका झाल्या. आता त्याला भारतीय संघात नवी जबाबदारी मिळाली आहे. त्याला भारतीय संघात संघ व्यवस्थापनाने नेटबॉलर म्हणून बोलावले आहे.

नबी व्यतिरिक्त आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून खेळणाऱ्या झीशान अन्सारी यालाही अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीच्या सरावासाठी नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर गुरजपनीत सिंग, प्रिन्स यादव, सारांश जैन आणि शिवांग कुमार यांचीही नेटबॉलर म्हणून निवड करण्यात आली आहे.

भारतीय कसोटी संघ विरुद्ध अफगाणिस्तान
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पदीकल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुथार, हर्ष दुबे, केएल राहुल, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रदर.

Comments are closed.