47 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण! आता 51 व्या वर्षी घेतल्या एकाच डावात 5 विकेट्स, ‘या’ क्रिकेटरने रचला इतिहास

ज्या वयामध्ये खेळाडू आपल्या कारकिर्दीची दुसरी सुरूवात करतात म्हणजे प्रशिक्षक किंवा समालोचन करतात, त्या वयात एका खेळाडूने क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी वयाच्या 51 व्या वर्षी 5 विकेट्स घेत 149 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला.
आयल ऑफ मॅनची (Isle Of Man) महिला क्रिकेटपटू जोआन हिक्स यांनी वयाच्या 47 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आता वयाच्या 51 व्या वर्षी एकाच डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यामुळे त्या पुरुष आणि महिला दोन्ही क्रिकेटमध्ये एकाच डावात 5 विकेट्स घेणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडू ठरल्या आहेत. याबरोबरच त्यांनी 96 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.
ग्रीसविरुद्ध खेळताना या उजव्या हाताच्या फिरकीपटूने त्यांच्या कारकिर्दीत चार वर्षाच्या आत तिसऱ्यांदा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यांनी 4 षटकांत केवळ 10 धावा देत या 5 विकेट्स घेतल्या. ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
हिक्स यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे ग्रीसला 15 षटकांत केवळ 52 धावा करता आल्या. हा सामना आयल ऑफ मॅनने पॉवरप्लेमध्येच 9 विकेट्स राखत जिंकला.
हिक्स यांनी वयाच्या 51 वर्ष आणि 173 दिवसांनी एकाच डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यामुळे त्या पुरुष आणि महिला या दोन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या 50 वर्षांनंतर 5 विकेट्स घेणाऱ्या पहिल्या गोलंदाज ठरल्या आहेत.
हिक्स यांच्या प्रभावी कामगिरीमुळे 94 वर्षांचा जुना विक्रम मोडला गेला आणि त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 5 विकेट्स घेणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडू ठरल्या. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या बर्ट आयर्नमॉग्नर यांचा विक्रम मोडला. त्यांनी 1932 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वयाच्या 49 वर्ष आणि 314 दिवसांनी एकाच डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 5 विकेट्स घेणारे वयस्कर गोलंदाज
51 वर्ष 173 दिवस – जोआन हिक्स, आइल ऑफ मॅन विरुद्ध ग्रीस (महिला टी20), 2026*
49 वर्ष 314 दिवस – बर्ट आयर्नमॉग्नर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, (पुरुष कसोटी), 1932
49 वर्ष 234 दिवस – बर्ट आयर्नमॉग्नर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, (पुरुष कसोटी), 1931
49 वर्ष 168 दिवस – जोआन हिक्स, आइल ऑफ मॅन विरुद्ध ग्रीस (महिला टी20), 2026*
49 वर्ष 162 दिवस – जोआन हिक्स, आइल ऑफ मॅन विरुद्ध ग्रीस (महिला टी20), 2026*
हिक्स यांची आंतरराष्ट्रीय कामगिरी
हिक्स यांनी आयल ऑफ मॅन संघासाठी आतापर्यंत 29 टी 20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांनी 36 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांचा इकॉनॉमी रेट केवळ 4.12 आहे. त्यांनी तीनदा एकाच डावात 5 विकेट्स घेण्याबरोबर एका डावात 4 विकेट्स घेण्याचीही कामगिरी केली आहे.
हिक्स या अशा कमी गोलंदाजांपैकी एक आहेत, ज्यांनी लागोपाठच्या दोन टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. (International debut at 47! Now, at 51, Isle Of Man Plyaer Joanne Hicks has taken 5 wickets haul vs Greece)
Comments are closed.