व्हिएतनाममध्ये हिंदुस्थानी पर्यटकांना घेऊन जाणारी बोट पलटली, 15 जणांचा मृत्यू
व्हिएतनाममध्ये हिंदुस्थानी पर्यटकांना घेऊन जाणारी बोट पलटली. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून, 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे. व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ ही घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. हिंदुस्थानी दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, बचावकार्याची माहिती घेत आहे. पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी मिन्ह सिटी आणि हनोईमध्ये इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर तयार करण्यात आले आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, बोटीत एकूण 36 पर्यटक होते. यापैकी 32 हिंदुस्थानी पर्यटक, तीन क्रू मेंबर्स आणि एक अटेंडंट होते. या दुर्घटनेत 15 हिंदुस्थानी पर्यटकांचा मृत्यू झाला असून 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बोट होन मे रुट बेटावरून आन थोई बंदराकडे परत येत होती. किनाऱ्यापासून सुमारे 400 मीटर अंतरावर समुद्रात उलटली. उंच लाटांमुळे हा अपघात झाला असावा, अशी प्राथमिक माहिती मिळते. तथापि, या घटनेच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.
Comments are closed.