काँगोमध्ये भीषण बोट अपघात! दोन मोटरबोटी एकमेकींना धडकल्या; 30 ठार, अनेक बेपत्ता
आफ्रिकेतील काँगो नदीत भीषण बोट दुर्घटना घडली आहे. दोन बोटींची धडक होऊन अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत. सर्व मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, दोन लाकडी मोटरबोटी वेगवेगळ्या दिशेने प्रवास करत होत्या. एक बोट ओबांगुई येथून राजधानी किन्शासाच्या दिशेने जात होती, तर दुसरी बोट किन्शासाहून लुकोलेलाकडे जात होती. दोन बोटींची टक्कर कशी झाली, हे प्राथमिक तपासात अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात रविवारी इक्वेटरच्या न्गोम्बे-लुकोलेला भागाजवळ घडला, असे प्रांतीय गृहमंत्री क्रिस्पिन म्पुतु यांनी सांगितले. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत नदीत शोधमोहीम सुरू केली.
Comments are closed.