ब्रिटिश एअरवेजच्या विमानात हवेतच आणीबाणी, काही मिनिटांत 28,000 फूट खाली आले; लंडन विमानतळावर हाय अलर्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लंडनहून शिकागोला जाणाऱ्या विमानात हवेतच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. काही मिनिटांत ब्रिटिश एअरवेजचे हे विमान 28,000 फूट खाली आले. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. वैमानिकाने Squawk 7700 हा आपत्कालीन कोड जारी केला असून, विमानाच्या स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. विमान लंडनला माघारी वळण्यात आले असून, हिथ्रो विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश एअरवेजचे BA295 हे विमान सोमवारी लंडनहून अमेरिकेतील शिकागोला चालले होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 11.50 वाजता निघाले. उड्डाणानंतर एका तासाने विमानाने 37,000 फूट गाठली होती. त्याचवेळी अचानक कार्यात्मक समस्या उद्भवली आणि विमान वेगाने खाली उतरायला लागले. काही मिनिटांतच विमान 28,000 फूट खाली आले आणि 9000 फुटांवर उडू लागले. आयर्लंडवरून विमान उडत असताना ही घटना घडली. वैमानिकाने तात्काळ Squawk 7700 हा आपत्कालीन संकेत जारी केला. यानंतर विमान लंडनला माघारी वळवण्यात आले.

Comments are closed.